मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 21 जुलै 2021 (13:13 IST)

टोकियो 2020 चे मुख्य कार्यकारीअधिकारी यांनी इशारा दिला,ऑलिम्पिक खेळ अंतिम क्षणी रद्द होऊ शकतात

The CEO of Tokyo 2020 warned that the Olympic Games could be canceled at the last minute Sports News In Marathi Webdunia Marathi
टोकियो ऑलिम्पिक सुरू होण्यास आता फक्त दोनच दिवस शिल्लक आहेत आणि त्याआधीही बर्‍याच ऍथलिटसची कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आहे.अशा परिस्थितीत टोकियो 2020 चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तोशिरो मुटो यांनी एक मोठे विधान केले आहे. शेवटच्या क्षणीही ऑलिम्पिक रद्द करता येईल, हे नाकारता येणार नाही, असे मुटो यांनी मंगळवारी सांगितले. ते म्हणाले की वाढत्या कोरोना पॉझिटिव्हमुळे आयोजकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. 
 
शुक्रवारी सुरू झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा अजूनही रद्द करता येऊ शकतात का, असे जेव्हा मुटो यांना विचारले गेले तेव्हा पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की ते संक्रमणाच्या संख्येवर लक्ष ठेवून आवश्यक असल्यास संयोजकांशी चर्चा करतील. 
 
मुटो म्हणाले, 'कोरोनो विषाणूचे प्रमाण किती वाढेल हे आपण सांगू शकत नाही. जर प्रकरणांमध्ये वाढ झाली असेल तर आम्ही चर्चा सुरू ठेवू. आम्ही सहमती दर्शविली आहे की कोरोनो व्हायरसच्या परिस्थितीनुसार आम्ही पुन्हा पाच पक्षांची बैठक बोलावू.अशा वेळी कोरोना विषाणूची प्रकरणे वाढू शकतात किंवा घसरण होऊ शकतात, म्हणून जेव्हा परिस्थिती उद्भवेल तेव्हा आपण काय केले पाहिजे ते पाहू. 
 
कोव्हीड -19  प्रकरणे टोकियोमध्ये सातत्याने वाढत आहेत आणि गेल्या वर्षी साथीच्या आजारामुळे टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आले होते. परंतु यावेळी प्रेक्षकांविना हे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जपानने या महिन्यात असा निर्णय घेतला की व्हायरसचा धोका कमी करण्यासाठी खेळाडू रिक्त स्टेडियम मधील खेळांमध्ये सहभागी होतील.