गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (15:09 IST)

महान फुटबॉलपटू शस्त्रक्रियेनंतरही आयसीयूमध्ये आहे, इंस्टावर आरोग्यविषयक माहिती दिली

साओ पाउलो : प्रख्यात फुटबॉल खेळाडू पेले अजूनही आयसीयूमध्ये आहे ज्याच्या पोटाची गाठ(ट्युमर) काढण्यासाठी शस्त्रक्रिया झाली आहे.साओ पाउलो येथील अल्बर्ट आइन्स्टाईन हॉस्पिटलने एका निवेदनात म्हटले आहे की, 80 वर्षीय एडसन अरांतेस डो नासिमेंटो (पेले) शस्त्रक्रियेनंतर बरे होत आहेत, जरी त्यांना आयसीयूमध्ये ठेवले आहे.
 
हॉस्पिटलने सांगितले की पेले बोलत आहेत आणि त्यांचे रक्तदाब आणि इतर गोष्टी सामान्य आहेत. तीन वेळा ब्राझीलच्या विश्वविजेत्याने आपल्या इन्स्टाग्रामवर असेही म्हटले की "दररोज मला थोडे बरे वाटत आहे." ''
 
 ऑगस्टमध्ये हा कोलन ट्यूमर (ओटीपोटाच्या उजव्या बाजूला एक गाठ ) आढळल्यावर ते   नियमित तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते.
 
तीन विश्वचषक जिंकणारे पेले हे एकमेव पुरुष खेळाडू आहे, त्याला 2012 मध्ये हिप ट्रान्सप्लांट झाल्यापासून चालण्यास त्रास होत होता. ते वॉकर किंवा व्हीलचेअरची मदत घेतात.अलीकडेच त्यांना किडनीशी संबंधित समस्याही झाल्या होत्या.
 
2019 च्या सुरुवातीला, पेले यांना मूत्राशयाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि यशस्वी मूत्रपिंड स्टोनच्या शस्त्रक्रियेनंतर सहा दिवसांच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली होती.
 
पेलेच्या अप्रतिम प्रतिभेने खेळाला नवे रूप दिले
जेव्हा पेलेने फुटबॉलच्या जगात पाऊल ठेवले, तेव्हा खेळाला नवीन रूप प्राप्त झाले. या अद्भुत प्रतिभेच्या खेळीतून ब्राझीलचा संघ उदयास आला. 1958 मध्ये जेव्हा ब्राझील पहिल्यांदा चॅम्पियन झाला, तेव्हा या महान ताऱ्याची महत्वाची भूमिका होती.पेलेने उपांत्य फेरीत हॅटट्रिक गोल केला आणि नंतर अंतिम फेरीत दोन गोल केले. दुखापतीमुळे ते 1962 चा विश्वचषक खेळू शकले  नाही.
 
1966 मध्येही विरोधी संघांनी त्याच्यावर जोरदार हल्ला करून त्यांना जखमी केले. असे असूनही, ब्राझील पुन्हा एकदा 1970 मध्ये चॅम्पियन बनला.पेलेने 1969 मध्ये आपला 1000 वा गोल केला, जेव्हा ते 909वा प्रथम श्रेणी सामना खेळत होते. पेले यांच्या नेतृत्वाखाली ब्राझीलने फुटबॉलमध्ये अनेक उल्लेखनीय यश मिळवले. त्याने आपल्या आयुष्यात 1363 सामने खेळले आणि 1281 गोल केले. 'ब्लॅक डायमंड' म्हणून ओळखले जाणारे पेले हे जगातील सर्वात आवडते खेळाडू मानले जातात.