गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (13:49 IST)

बोपन्ना-डोडिंग तिसऱ्या फेरीत पराभूत, भारतीय आव्हान यूएस ओपनमध्ये संपले

अनुभवी भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि त्याचा क्रोएशियन जोडीदार इव्हान डोडिंग यांनी सोमवारी राजीव राम आणि जो सॅलिसबरी या चौथ्या मानांकित जोडीसमोर  अमेरिकन ओपनमध्ये पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत कठीण आव्हान उभे केले असले तरी पराभूत झाले.

बोपन्ना-डोडिंगया 13 व्या जोडीला दोन तास आणि 30 मिनिटांच्या सामन्यात उपविजेत्या ऑस्ट्रेलियन ओपन जोडीकडून 7-6 4-6 6-7 ने पराभव पत्करावा लागला.हंगामाच्या अंतिम ग्रँडस्लॅम स्पर्धेतील भारतीय आव्हान बोपन्ना आणि डोडिंग यांच्या पराभवामुळे संपुष्टात आले.

सानिया मिर्झा पहिल्या फेरीत महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीत पराभूत झाली, तर अंकिता रौना देखील महिला दुहेरीत पराभूत झाली. प्रज्ञेश गुणेश्वरन, सुमित नागल आणि रामकुमार रामनाथन एकेरी प्रकारातील मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरले आणि क्वालिफायरमध्येच हरले.