थॉमस आणि उबेर कप: प्रणीत आणि सायना संघाचे नेतृत्व करणार, सिंधूने विश्रांती घेतली
बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया (BAI) ने थॉमस आणि उबेर कपसाठी प्रत्येकी 10 सदस्यीय संघ आणि सुदीरमन कपसाठी 12 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बी साई प्रणीत 9-17 ऑक्टोबर दरम्यान डेन्मार्कमध्ये होणाऱ्या थॉमस आणि उबर कपमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष संघांचे नेतृत्व करतील. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू, ही संघात नाही, तिला विश्रांती देण्यात आली आहे.बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया (BAI) ने थॉमस आणि उबेर कपसाठी प्रत्येकी 10 संघ आणि सुदीरमन कपसाठी 12 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
थॉमस कप संघ:
बी साई प्रणीत,किदांबी श्रीकांत,किरण जॉर्ज,समीर वर्मा, सात्विकसाईराज रंकीरेड्डी,चिराग शेट्टी,ध्रुव कपिला, एमआरअर्जुन,कृष्ण प्रसाद,विष्णू वर्धन.
उबेर कप संघ:
सायना नेहवाल, मालविका बनसोड,अदिती भट्ट,तन्सीम मीर,तनिषा क्रॅस्टो,ऋतुपर्णा पांडा,अश्विनी,पोनप्पा,एन सिक्की रेड्डी,गायत्री,टी जॉली.
सुदीरमन कप संघ:
पुरुष: श्रीकांत, प्रणीत, सात्विक, चिराग, ध्रुव, अर्जुन.
महिला: मालविका, अदिती, तनिषा, ऋतुपर्णा, अश्विनी, सिक्की.