मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (15:29 IST)

Tokyo Olympics:भारतासाठी आणखी एक पदक निश्चित, कुस्तीपटू रवी कुमार अंतिम फेरीत पोहोचला

भारतीय कुस्तीपटू रवी कुमार अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याने उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या कुस्तीपटू नुरिस्लामचा पराभव केला.या विजयासह रवीने रौप्यपदक पक्के केले आहे. 
 
भारतीय कुस्तीपटू रवी कुमारने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. त्याने पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो गटात अंतिम फेरी गाठली. रवीने उपांत्य फेरीत कझाकिस्तानचा पैलवान सनायव नुरिस्लामचा पराभव केला. रवीकुमार सलामीच्या सामन्यात 5-9 ने मागे होता पण त्याने कझाकस्तानच्या कुस्तीपटूला पराभूत करण्यासाठी जोरदार पुनरागमन केले. या विजयासह त्याने रौप्यपदक पक्के केले आहे.ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारा रवी कुमार भारताचा पाचवा कुस्तीपटू आहे. त्यापूर्वी केडी जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक यांनी ऑलिम्पिक कुस्तीमध्ये भारतासाठी पदके जिंकली आहेत.  
 
रवी कुमार अंतिम फेरीत पोहोचला
भारतीय कुस्तीपटू रवी कुमारने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. त्याने पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो गटात अंतिम फेरी गाठली. रवीने उपांत्य फेरीत कझाकिस्तानचा पैलवान सनायेव नुरिस्लामचा पराभव केला. रवी कुमार सलामीच्या सामन्यात मागे होता पण कझाकिस्तानच्या कुस्तीपटूला पराभूत करण्यासाठी त्याने जोरदार वापसी केली.