सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (14:15 IST)

US Open 2022: सेरेना विल्यम्सने तिच्या शेवटच्या स्पर्धेतील पहिला सामना जिंकला

टेनिसला अलविदा करणारी अमेरिकेची दिग्गज खेळाडू सेरेना विल्यम्सने आपल्या शेवटच्या स्पर्धेतील यूएस ओपनमधील पहिल्या फेरीचा सामना जिंकला आहे.सेरेनाने 80व्या मानांकित माँटेनिग्रोच्या डंका कोविनिकचा 6-3, 6-3 असा पराभव केला. 
विजयानंतर, सहा वेळा यूएस ओपन आणि 23 वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेना म्हणाली, "जेव्हा मी कोर्टवर आलो, तेव्हा प्रेक्षकांच्या स्वागताने मी भारावून गेले.छान वाटत आहे .मी ते कधीच विसरणार नाही."
 
हा सामना पाहण्यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, मार्टिना नवरातिलोवा, माइक टायसन, सेरेनाची आजी आणि वडील आणि मुलगीही उपस्थित होते.सेरेनाने 1999 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी येथे पहिले विजेतेपद पटकावले होते. 
 
सेरेनाशिवाय गतविजेत्या बियान्का अँड्रीस्कू, अँडी मरे, डॅनिल मेदवेदेव, कोको गाओ यांनीही दुसरी फेरी गाठली मात्र सर्वांच्या नजरा सेरेनाच्या सामन्याकडे लागल्या होत्या.