शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

विकास कृष्णनला पुरस्कार

नवी दिल्ली- आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता भारताचा बॉक्सर विकास कृष्णनला यावर्षी केलेल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनकडून सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला भारतीय बॉक्सर ठरला आहे.
 
24 वर्षीय विकास कृष्णन हा सध्या अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे असून पुढच्या हंगामासाठीची तयार करत आहे. विकासला 2010 साली अशियाई स्पर्धेमध्ये सुवर्ण व 2014 सालच्या स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळाले आहे.