शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोनीपत , सोमवार, 10 एप्रिल 2017 (11:18 IST)

गावातील मुले शिकणार इंग्रजी - योगेश्वर दत्त

ऑलिम्पिकचे कांस्यपदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त याच्या गावात पंचायत समितीने शासकीय शाळेच शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आगळावेगळा निर्णय घेतला आहे. शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे पालकांनी शाळेत शिकण्यास मनाई केली होती. पालकांचा पवित्रा लक्षात घेऊन पंचायतने प्रशंसनीय निर्णय घेतला. शिक्षक मिळत नाही म्हणून सुशिक्षित युवक-युवतींना अध्यापन कर्यात सहभागी करून घेण्याचा निर्णय पंचायतने घेतला आणि या युवक युवतींना पंचायततर्फे वेतन देण्यात येणार आहे. त्यामुळे कुस्तीपटू योगेश्वर दत्तच्या गावात आता गरीब मुले मुली इंग्रजी माध्यमातूनही शिकणार आहेत. शिक्षण व्यवस्थामधील या सुधारणांसाठी एक दक्षता समितीसुद्धा नेमण्यात आली आहे. पंचायतच्या या निर्णयामुळे पालकही खुश आहे व तेही आपल्या मुलांना या शासकीय शाळेत पाठविण्यास रजी झालेले आहेत.