मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. फिल्लमबाजी
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (13:14 IST)

जॉनी लिव्हर वाढ दिवस विशेष : पोट भरण्यासाठी एकेकाळी पेन विकायचे

Johnny Liver Birth Day Special: I used to sell pens to fill my stomach Star Profile in Marathi Webdunia Marathi
चित्रपट विश्वात कॉमेडीला नवे रूप देणारे जॉनी लीव्हर आज आपला 64 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज जॉनी लीव्हर त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आणि मजेदार पात्रामुळे विनोदाचे प्रतीक मानले जाते. जॉनीने आतापर्यंत 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.या दरम्यान त्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर करोडो लोकांची मने जिंकली.
 
जॉनी ने चित्रपट विश्वात कॉमेडीला नवी उंची दिली. त्यांना आतापर्यंत 13 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. जॉनीचा जन्म 14 ऑगस्ट 1957 रोजी आंध्र प्रदेशात झाला. त्यांचे वडील प्रकाश राव जनमूला हिंदुस्थान लीव्हर फॅक्टरीमध्ये काम करायचे.जॉनी लहानपणापासूनच खूप गमतीशीर स्वभावाचे होते. ते अनेकदा इतरांना  खूप हसवायचे.यामुळे,जॉनीच्या मित्रांना ते खूप आवडायचे.
 
जॉनी लीव्हरला दोन भाऊ आणि तीन बहिणी आहेत,त्यापैकी जॉनी सर्वात मोठे आहे.जॉनी अत्यंत गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्यांनी अभ्यास सोडून पेन विकायला सुरुवात केली.त्यांनी पेन विकण्याचा एक अतिशय अनोखा मार्ग शोधला.ते बॉलिवूड स्टार्स सारखे नृत्य करून पेन विकायचे.यामुळे त्यांची विक्री चांगली व्हायची. 
 
जॉनीचे खरे नाव जॉनी प्रकाश होते.जॉनी प्रकाश जॉनी लीव्हर कसे झाले?  जॉनी हिंदुस्तान लीव्हरमध्ये काम करायचे.कंपनीमध्ये ते अनेकदा त्याच्या मित्रांमध्ये अभिनय आणि विनोद करून त्यांना खूप हसवायचे. इथेच त्यांचे नाव जॉनी प्रकाश ते जॉनी लीव्हर असे झाले.  
 
 जॉनी लीव्हरने आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक उंची गाठल्या.जॉनीचे बरेच चित्रपट त्या काळात सुपर डुपर हिट ठरले.वर्ष 2000 मध्ये या अभिनेत्याने विक्रमी 25 चित्रपट केले.आज प्रत्येकजण या प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखतो,