सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. फिल्लमबाजी
Written By

कलाकारांचे वास्तविक नावं

नावात काय आहे, असे काही जण म्हणतात तरी ही गोष्ट नाकारता येणार नाही की सिनेमा जगात नावाला फार महत्त्व आहे. बॉलीवूडमध्ये कित्येक तरी कलाकारांनी आपली नावे बदलली आणि यश गाठले. पाहू या काही कलाकार ज्यांची मूळ नावे वेगळी आहेत...


टाइगर श्रॉफचे खरे नाव हेमंत जय श्रॉफ असे आहे.


सिनेमात येण्यापूर्वी लोकं मल्लिका शेरावतला रीमा लांबा या नावाने ओळखायचे.

शिल्पा शेट्टीचं वास्तविक नाव अश्विनी शेट्टी आहे. तरुणपणी न्यूमरोलॉजिस्टचा सल्ला ऐकून तिनी आपलं नाव शिल्पा ठेवलं.
अजय देवगनचे खरे नाव विशाल देवगन आहे.

सैफ अली खानचे खरे नाव साजिद अली खान असे आहे.

सर्वात हॉट अभिनेत्री सनी लिओन हिचे वास्तविक नाव करणजीत कौर वोरा आहे.

मुलींच्या आवडत्या जॉन अब्राहमचे खरे नाव फरहान आहे. आपल्या वडिलांच्या सल्ल्याने त्याने आपले नाव बदलले.
नाना पाटेकर यांचे वास्तविक नाव विश्वनाथ पाटेकर असे आहे.

सुपरहीरो रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड़ असे आहे.

अक्षय कुमारचे खरे नाव राजीव हरी ओम भाटिया असे आहे. 

कॅटरिना तुरकोट्टे बोलण्यात कठीण असल्यामुळे ही आता कॅटरिना कैफ म्हणून ओळखली जाते.