बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. स्वाइन फ्लू
Written By अभिनय कुलकर्णी|

कमजोर पडलाय स्वाइन फ्लूचा विषाणू

ND
ND
मेक्सिकोमधून उद्भवलेला स्वाइन फ्लूचा विषाणू बराच कमजोर पडला आहे. त्यामुळे आता त्यापासून घाबरण्याची गरज नाही, असा दावा काही डॉक्टरांनी केला आहे.

भोपाळचे प्रख्यात डॉक्टर व अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांत शोधनिबंधांचे वाचन केलेले डॉ. निशांत नंबीसन यांच्या मते, स्वाइन फ्लू आता तेवढा धोकादायक राहिलेला नाही. होमियोपॅथी आणि आयुर्वेदाच्या अनेक डॉक्टरांनी या तापाला नियंत्रणात आणता येतील अशी औषधे आपल्या शास्त्रांत असल्याचा दावा केला आहे.

होमियोपॅथीमध्ये इनफ्लुएंजियम २०० चा डोस घेतल्याने स्वाइन फ्लूची लागण होत नाही, असे डॉ. नंबीसन यांचे म्हणणे आहे. याशिवाय या पॅथीत अनेक औषधे स्वाइन फ्लूवर परिणामकारक ठरू शकतील अशी आहेत, असा त्यांनी दावा केला.

भोपाळचेचे प्रसिद्ध वैद्य पंडित चंद्रशेखर वैद्य यांनी सांगितले, की स्वाइन फ्लूला आयुर्वेदात फुफ्फुस रोग असे म्हणतात. या रोगावर महामृगांक रस हे रामबाण औषध आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने पाच दिवस याचे सेवन केल्यास या रोगावर नियंत्रण राखता येते, असा दावा त्यांनी केला.

त्यांच्या मते स्वाइन फ्लूचा विषाणू श्वासनलिकेच्या माध्यमातून फुफ्फुसावर हल्ला चढवतो. त्यामुळे रूग्णाची तब्बेत बिघडते. परिणामी त्याचा जीव जातो. अशावेळी रोग्याला महामृगांक रस व जयमंगल रसयुक्त औषधे द्यायला हवीत.