स्वाईन फ्ल्यू अर्थात इन्फल्युएंझा ए (एच १ एन १) या साथीवर मात करता यावी यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. टॅमीफ्लू या औषधाचा पुरेसा साठा आणि इतर आरोग्य सुविधा संबंधितांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शासन यंत्रणेला जनतेचं सहकार्य अपेक्षित असून ...
स्वाइन फ्ल्यू हा आजार बरा होणार आजार आहे. जनतेने अफवाना बळी न पडता दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राचे वैद्यकिय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. वासुदेव तायडे यांच्याशी साधलेला संवाद...
भारतात सध्या सर्वच राज्यात स्वाइन फल्यू अर्थात ए.(एच १ एन १) चा साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. मात्र सर्वच राज्य सरकारांनी या आजाराबाबत पुरेशी जनजागृती करुन साथीला आळा घालण्यासाठी सुयोग्य कार्यक्रम अंमलात आणलेला नाही.
नाशिक स्वाईन फ्ल्यू नाशिकमध्ये वेगाने पाय पसरत आहे. एका डॉक्टरच्या मृत्यूनंतर आणखी नऊ संशयित रूग्ण सापडले आहेत. आरोग्य राज्यमंत्री शोभा बच्छाव यांनी यास पुष्टी दिली.
पुणे स्वाइन फ्लूचा कहर वाढत चालला असून आज आतापर्यंत पुण्यात दोन जणांचा बळी या रोगाने घेतला आहे. यात एका ९ महिन्याच्या अर्भकाचा आणि ७५ वर्षांच्या वृद्ध महिलेचा समावेश आहे. यामुळे स्वाइन फ्ल्यू बळींची संख्या १९ वर जाऊन पोहोचली आहे.
मुंबई एरवी कधीही न थांबणारी मुंबई स्वाईन फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवरही आपल्या लौकीकाला जागली असली तरीही भीतीने एखाद्या 'स्लो लोकल' सारखी धावत होती. शाळा-कॉलेजेस बंद असल्यामुळे या भागात शुकशुकाट होता, तर जीवनरेखा असलेल्या रेल्वेगाड्यातही फारशी गर्दी ...
नवी दिल्ली स्वाइन फ्लूने २० बळी घेतल्यानंतर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मौन सोडले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
सर्दी, खोकला, ताप असेल तर शक्यतो कामावर जाऊ नये. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. खोकताना, शिंकताना आपल्या तोंडाला रुमाल लावावा. धुम्रपानाच्या सवयीमुळे श्वसनशक्ती कमी होते. त्या विषाणूचे प्रवेशद्वार श्वसननलिका आहे.
स्वाईन फ्ल्यू हा आजार विषाणू पासून होतो त्याचा प्रसार प्रामुख्याने हवेतून होतो. या आजाराचा अधिशयन कालावधी १ ते ७ दिवस आहे. स्वाईन फ्ल्यू ची प्रमुख लक्षणे म्हणजे ताप, घसा खवखवणे, नाक चोंदणे, डोकेदुखी, अंगदुखी व क्वचित प्रसंगी उलटी व जुलाब अशी आहेत. ...
मुंबई, दि. 12 ऑगस्ट : यंदा गणेशोत्सवावर दहशतवादाबरोबरच स्वाइन फ्ल्यूचे सावट आहे. अशावेळी जनतेने गणेश दर्शनासाठी गर्दी करणे टाळावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. लालबागच्या राजाला होणारी गर्दी कमी करण्यासाठी वाहिन्यांनी त्याच्या ...
स्वाइन फ्लू आटोक्यात येत नसल्याचे स्पष्ट होताच मुंबईत सरकारने आता शाळा, कॉलेजेस, मॉल्स आणि मल्टिप्लेक्स बंद ठेवण्याचा निर्णय आज घेतला. देशभर विविध उपाय योजूनही स्वाइन फ्लूचे बळी मात्र थांबलेले नाहीत. देशभरातील मृतांचा आकडा आता १५ वर जाऊन पोहोचला
मुंबईतील स्वाइन फ्ल्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्या दिनांक 13 ऑगस्टपासून बृहन्मुंबई क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस इत्यादी शैक्षणिक संस्था सात दिवसांकरिता; तर, मुंबईतील सर्व थिएटर्स तीन दिवसांकरिता बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने ...
नवी दिल्ली कॅडिला फार्मास्युटिकल्स (सीपीएल) इनफ्लूएंझा एच १ एन १ अर्थात स्वाइन फ्लूवर लस बाजारात आणण्याच्या तयारीत असून त्याची वैद्यकिय चाचणी करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागण्यात आली आहे. ही लस डिसेंबरपर्यंत बाजारात येण्याची अपेक्षा आहे.
भोपाळ मेक्सिकोमधून उद्भवलेला स्वाइन फ्लूचा विषाणू बराच कमजोर पडला आहे. त्यामुळे आता त्यापासून घाबरण्याची गरज नाही, असा दावा काही डॉक्टरांनी केला आहे.
नवी दिल्ली, दि. ११ ऑगस्ट, (हिं.स.) - देशभरात स्वाईन फ्ल्यू वर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी, विविध पातळ्यांवर युद्धस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. येत्या सहा महिन्यांच्या आत भारतीय कंपन्या स्वाईन फ्ल्यू विरोधी लस बनवतील. मात्र त्याआधी जगभरातील ...
पुणे, दि. ११ ऑगस्ट, (हिं.स.) - राज्यभरात स्वाईन फ्ल्यू चा फैलाव वाढत असतानाच, पुणे शहरात सोमवारी आणखी तीन बळी नोंदवले गेल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महानगराने आपल्या शाखा, जाहीर ...
औरंगाबाद- महाराष्ट्रात स्वाइन फ्लू वेगाने पसरत असून, मराठवाड्यात अनेक ठिकाणी या रोगाचे रुग्ण आढळले असून, यांची संख्या 12 वर पोहचली आहे.
लखनौ आयुर्वेदात अतिशय गुणकारी मानली गेलेली तुळस सध्या धुमाकूळ घालत असलेल्या स्वाइन फ्लूवरही प्रभावी असल्याचा दावा काही आयुर्वेदिक डॉक्टरांनी केला आहे. तुळशीमुळे स्वाइन फ्लू दूर रहातो किंवा त्याचा प्रादुर्भाव झालेली व्यक्ती बरी होण्यास तुळस मदत ...
नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील शाळांमधील दोन विार्थ्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेच्या आरोग्य विभागाने आजपासून तात्काळ खाजगी तसेच पालिका अशा जवळपास १५० शाळांतील विद्यार्थ्यांची प्राथमिक तपासणी (स्क्रिनिंग) करण्यास ...
ठाणे, १० ऑगस्ट (हिं.स)- ठाण्यातील ए. के. जोशी इंग्लिश शाळेत स्वाईन फ्लूचा संशयित रुग्ण आढळल्याने पालकांनी सोमवारी शाळेला घेराव घालून व्यवस्थापनास शहरातील न्यू इंग्लिश स्कूल आणि कोपरीतील पिपल्स एज्यूकेशन इंग्रजी माध्यमाची शाळा आठवडाभरासाठी बंद ...