रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. स्वाइन फ्लू
Written By अभिनय कुलकर्णी|

स्वाइन फ्लूवर पंतप्रधानांनी सोडले मौन

स्वाइन फ्लूने २० बळी घेतल्यानंतर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मौन सोडले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री गुलाब नबी आझाद यांनी स्वाईन फ्लूच्या स्थितीची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत दिल्यानंतर पंतप्रधानांनी वरील सल्ला दिला. स्वाइन फ्लूला तोंड देण्यास सरकार सक्षम आहे, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण व्हायला हवा असे सांगून उगाचच भीती निर्माण व्हायला नको असे ते म्हणाले. स्वाइन फ्लू हे देशासमोरचे नक्कीच मोठे संकट आहे.मात्र, सरकार त्याला यशस्वी तोंड देत आहे, असेही त्यांनी नमूद केले.