* सर्दी, खोकला, ताप असेल तर शक्यतो कामावर जाऊ नये. * गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. * खोकताना, शिंकताना आपल्या तोंडाला रुमाल लावावा. * धुम्रपानाच्या सवयीमुळे श्वसनशक्ती कमी होते. त्या विषाणूचे प्रवेशद्वार श्वसननलिका आहे. * नाकाच्या आणि घशाच्या स्त्रावातील थेंबामुळे हा व्हायरस पसरतो. खोकताना, शिंकताना हे थेंब इकडे तिकडे पडतात. त्याच्यामुळे कार्यालयातील टेबल आणि इतर वस्तू पुसाव्यात. * आपला हात साधारणत: इकडे तिकडे लागतो, त्यामुळे तो साबणाने धुण्याच्या सवयी असाव्यात. * आपली रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवण्यासाठी शारीरिक आणि मानसिक ताण टाळणे आवश्यक. * पुरेशी विश्रांती / झोप घेणे आवश्यक. * आपला आहार आरोग्यदायी असावा आणि डिहायड्रेशन टाळण्याकरता भरपूर पाणी प्यावे. * हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत. * पौष्टिक आहार घ्यावा. * लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या सी -व्हिटॉमिन असलेल्या पदार्थांचा आहारात वापर करावा. * खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा . * एन ९५ मास्क हा या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्ण, त्याच्यावर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी आणि या रुग्णाच्या संपर्कात येणार्या व्यक्तींनी वापरण्याची आवश्यकता. * इतर लोकांनी हातरुमाल किंवा साधा मास्क वापरला तरी चालू शकते.
हे टाळा : * हस्तांदोलन अथवा आलिंगन. * सार्वजनिक ठिकाणी थुंकणे . * डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे . * धुम्रपान करणे . * गर्दीमध्ये जाणे. * स्वाईन फ्लू रुग्णापासून किमान एक हात दूर राहावे .