शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. स्वाइन फ्लू
Written By अभिनय कुलकर्णी|

पुण्यातील दोघांसह स्वाइन फ्लूचे १७ बळी

ND
ND
स्वाइन फ्लू आटोक्यात येत नसल्याचे स्पष्ट होताच मुंबईत सरकारने आता शाळा, कॉलेजेस, मॉल्स आणि मल्टिप्लेक्स बंद ठेवण्याचा निर्णय आज घेतला. देशभर विविध उपाय योजूनही स्वाइन फ्लूचे बळी मात्र थांबलेले नाहीत. देशभरातील मृतांचा आकडा आता १७ वर जाऊन पोहोचला आहे.

मुंबईतल्या बळींची संख्या वाढू लागल्यानंतर आणि शहरात या रोगाच्या वेगवान प्रसाराची भीती असल्यामुळे अखेर पुढचे सात दिवस शाळा, कॉलेजेस, खासगी कोचिंग क्लासेस बंद रहातील. मॉल, मल्टिप्लेक्स आणि थिएटर्स तीन दिवसर बंद रहातील. आगामी काही दिवसांत दहिहंडी आणि गणेशोत्सव हे मोठे सण आहेत. ते साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन राजकीय पक्षांतर्फे करण्यात आले आहे.

स्वाइफ्लूमुळससूहॉस्पिटलमध्यउपचाघेअसलेल्यवर्षाच्यगौतशेलायांचमृत्यझाला. त्यामुळपुण्यातीस्वाइफ्लूमुळमृत्यूमुखपडलेल्यांचसंख्यआणि देशातीबळींचसंख्यझालआहे. याआधीज (बुधवारी) दुपारनीतमेघानी (०) आणि सकाळसाडदहाच्यसुमाराबाबकुलंयांचस्वाइफ्लूमुळमृत्यझाला. याशिवाय आज नाशिकमध्ये रूपेश गांगुर्डे या डॉक्टरांचाही मृत्यू झाला. नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा हा पहिलाच बळी. मूळचे मनमाडचे असले गांगुर्डे यांच्यात उलट्या आणि तापाची लक्षणे दिसून आली होती. पुण्यात श्रावणी देशपांडे (२९) या तरूणीचाही काल रात्री मृत्यू झाला. फुफ्फुसात संसर्ग झाल्याने तिचा मृत्यू झाला. ती पुण्यातील कोथरूड भागातील रहिवासी होती. या आधी पुण्यात संजय मिस्त्री या आणखी एका रूग्णाचा मृत्यू झाला होता.

एकट्या महाराष्ट्रात स्वाइन फ्लूचे १४ बळी गेले असून गुजरातमध्ये दोन, केरळ व तमिळनाडूत प्रत्येकी एक बळी गेला आहे. आता पुण्याच्या शासकीय रूग्णालयात अद्यापही पाच रूग्ण गंभीर अवस्थेत आहेत. याशिवाय दिल्लीत तीन व मुंबईत दोन रूग्ण अत्यवस्थ आहेत.