शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. स्वाइन फ्लू
Written By अभिनय कुलकर्णी|

नाशिकमध्ये ९ संशयित रूग्ण

स्वाईन फ्ल्यू नाशिकमध्ये वेगाने पाय पसरत आहे. एका डॉक्टरच्या मृत्यूनंतर आणखी नऊ संशयित रूग्ण सापडले आहेत. आरोग्य राज्यमंत्री शोभा बच्छाव यांनी यास पुष्टी दिली.

डॉ. रूपेश गांगुर्डे यांच्या मृत्यूने नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला बळी गेला. त्यानंतरही शहरात स्वाईन फ्ल्यूग्रस्तांची संख्या वाढतच आहे. दरम्यान, एका शिक्षकाचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. त्याचे जिल्हाधिकार्‍यांनी खंडन केले. फ्ल्यूने ग्रस्त असलेल्या एका रूग्णाला घरी सोडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.