रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. स्वाइन फ्लू
Written By अभिनय कुलकर्णी|

अशी लढाई सुरू आहे स्वाईन फ्लूशी

- आरोग्य संचालक डॉ. डी.एस.डाखुरे

स्वाईन फ्ल्यू हा आजार विषाणू पासून होतो त्याचा प्रसार प्रामुख्याने हवेतून होतो. या आजाराचा अधिशयन कालावधी १ ते ७ दिवस आहे. स्वाईन फ्ल्यू ची प्रमुख लक्षणे म्हणजे ताप, घसा खवखवणे, नाक चोंदणे, डोकेदुखी, अंगदुखी व क्वचित प्रसंगी उलटी व जुलाब अशी आहेत. बाधीत रुग्ण लक्षणे सुरु होण्याच्या एक दिवस आधीपासून पुढील सात दिवस इतरांना आजार पसरवू शकतो.

स्वाइन फ्लूवर उपचा
स्वाईन फ्ल्यू आजाराचे निदान करण्यासाठी घशातील, नाकातील स्त्रावाचे नमूने घेवून प्रयोगशाळा तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे किंवा हाफकिन संस्था, मुंबई येथे पाठविले जातात. प्रयोगशाळा तपासणीचा अहवाल चोवीस तासानंतर उपलब्ध होतो. स्वाईन फ्ल्यू आजाराच्या उपचारासाठी व प्रतिबंधक उपचारासाठी टॅमी फ्ल्यू हे प्रभावी औषध उपलब्ध आहे. त्याचा पुरेसा साठा केंद्र सरकारकडून प्राप्त झाला आहे. राज्याच्या मागणीनुसार अतिरिक्त साठा वेळोवेळी पुरविण्यात येत आहे. औषधोपचारासाठी टॅमी फ्ल्यू कॅप्सूल सकाळ - संध्याकाळ एक याप्रमाणे पाच दिवस देण्यात येते. दहा वर्षाखालील मुलांना टॅमी फ्ल्यू सायरप उपलब्ध आहे. टॅमी फ्ल्यू औषधाची उपलब्धता निवडक शासकीय व महानगरपालिका रुग्णालयात उपलब्ध आहे.

प्रतिबंधात्मक उपचा
स्वाईन फ्ल्यू चा प्रसार टाळण्यासाठी बाधित रुग्णांच्या प्राथमिक सहवासितांना दररोजची एक टॅमी फ्ल्यू कॅप्सूल दहा दिवस देण्यात येते.

मास्कचा वाप
स्वाईन फ्ल्यू च्या नियंत्रणासाठी प्रयोगशाळेत व विलगीकरण कक्षात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांनी एन ९५ मास्क वापरावा. स्क्रीनींग सेंटर व सँपल कलेक्शन सेंटर येथे कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी निमवैद्यकीय कर्मचार्‍यांनी एन ९५ मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. त्यांनी तीन पदरी सर्जिकल मास्क वापरावा. संशयित रुग्णांनी व बाधित रुग्णांनी तीन पदरी सर्जिकल मास्क वापरावा. जनतेन उपलब्धतेप्रमाणे सर्जिकल मास्क वापरण्यास हरकत नाही. परंतू त्याची योग्य विल्हेवाट लावावी. गर्दीत जाते वेळी आपल्या हातरुमालाचा वापर चार पदरी घडी करुन करावा.

खाजगी डॉक्टरांची मद
शासनाने मुंबईतील १९ व पुण्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या रुग्णालयांची निवड केली आहे. येथे उपलब्ध असलेल्या सुविधांची पाहणी वैद्यकीय महाविद्यालयातील चमू मार्फत करण्यात येत आहे. तेथील उपलब्ध सोयीनुसारच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या रुग्णालयांचा समावेश करुन घेतला जाईल. त्यानुसार त्यांना आवश्यकतेप्रमाणे टॅमी फ्ल्यू औषधीचा पुरवठा करण्यात येईल.

केंद्र शासनाची मद
स्वाईन फ्ल्यू साथ नियंत्रणासाठी आवश्यक औषधी, एन ९५ मास्कचा १०० टक्के पुरवठा केंद्र शासनाकडून करण्यात येत आहे. औषधांचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे. स्वाईन फ्ल्यूच्या साथ नियंत्रणाच्या अनुषंगाने राज्यात करण्यात आलेल्या कार्यवाहीची पाहणी करण्यासाठी व आवश्यक तांत्रीक मार्गदर्शन देण्यासाठी केंद्र शासनाने वेगवेगळे ३ चमू मुंबई, पुणे व सातारा याठिकाणी पाठविले आहेत. त्यांचे मार्गदर्शन, सूचनांनूसार आवश्यक कार्यवाही सुरु आहे. (सौजन्य- महान्यूज)