अर्थसंकल्पाची सात कागदपत्रे, जाणून घ्या ते कोणते आहे
अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सात कागदपत्रांची आवश्यकता असते.
1. अर्थमंत्र्यांचे भाषण
अर्थमंत्र्यांचे भाषण दोन भागांमध्ये असते. पहिल्या भागात सामान्य आर्थिक विवरण असते. दुसर्या भागात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कर प्रस्तावांशिवाय आगामी वर्षात आर्थिक पातळीवर सरकारद्वारे घेण्यात येणार्या निर्णयांची माहिती असते.
2. वार्षिक अर्थविषयक घडामोडींची माहिती
हे अर्थसंकल्पातील सर्वांत महत्त्वाचे कागदपत्रं मानले जाते. यात सरकारने चालू वित्त वर्षासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती असते.
3. अर्थसंकल्पाचा सारांश
यात अर्थसंकल्पा सारांशात मांडलेला असतो. आगामी आकडेवारी, आकृत्यांचा यात समावेश असतो. राज्यांकडून मिळणारी रक्कम, होणारा खर्च या सार्यांची माहिती यात असते.
4. अर्थ विधेयक
सरकारद्वारे प्रस्तावित कर प्रस्तावांची इत्थंभूत माहिती या कागदपत्रांमध्ये असते.
5. अर्थसंकल्पाचे निर्णय
या कागदपत्रांमध्ये आगामी वर्षांसाठी सरकारला मिळणारी परवानगी तसेच सरकारला मिळणारे कर्ज परराष्ट्रीय कर्ज आदी विषयांची माहिती दिलेली असते.
6. अर्थसंकल्पातील खर्च
सरकारद्वारे आगामी आर्थिक वर्षात खर्च करण्यात येणारा निधी, विविध विभागांवर होणारा खर्च, मंत्रालयांवर होणारा खर्च या सार्यांची तरतूद यात असते.
7. अनुदानाची मागणी
यात विविध मंत्रालयाने मागितलेल्या अनुदानाची माहिती देण्यात आलेली असते.