शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2022 - 2023
Written By
Last Modified: मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (13:55 IST)

कपडे- जोड्यांसह या सर्व वस्तू झाल्या स्वस्त, जाणून घ्या कोणत्या वस्तूंचे वाढले दर

अर्थमंत्री सीतारामन यांनी आज चौथा अर्थसंकल्प सादर केला. आजच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काही वस्तू महाग होतील तर काही वस्तू स्वस्त होतील. यावेळच्या अर्थसंकल्पात कोणत्या वस्तूंच्या किमतीत कपात होणार आहे आणि कोणत्या वस्तूंचे दर वाढणार आहेत.
 
स्वस्त वस्तू
परदेशातून येणाऱ्या मशिन्स स्वस्त होतील
कापड आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होतील
शेतीची साधने स्वस्त होतील
मोबाइल चार्जर
पादत्राणे
हिऱ्याचे दागिने
पॅकेजिंग बॉक्स
रत्ने आणि दागिने
 
महाग वस्तू
छत्री
भांडवली वस्तू
मिश्रण नसलेले इंधन
इमिटेशन दागिने
 
कस्टम ड्युटी कमी केली
अर्थसंकल्पात सरकारने रत्ने आणि दागिन्यांवर कस्टम ड्युटी कमी केली आहे. कस्टम ड्युटीमध्ये 5 टक्के कपात करण्यात आली आहे. याशिवाय कापलेल्या आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवरील कस्टम ड्युटीही सरकारने कमी केली आहे. त्यातही 5 टक्के कपात करण्यात आली आहे. स्टील स्क्रॅपवरील कस्टम ड्युटी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर मेंथा तेलावरील कस्टम ड्युटीही कमी करण्यात आली आहे.
 
ज्या वस्तूंवर सीमाशुल्क वाढवले
सीमाशुल्क वाढीबाबत बोलायचे तर या अर्थसंकल्पात भांडवली वस्तूंवरील सीमाशुल्क आणि आयात शुल्क 7.5 टक्के करण्यात आले आहे. याशिवाय इमिटेशन ज्वेलरीवरही कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. परदेशी छत्र्यांच्या किमतीही वाढणार आहेत. मिश्रित नसलेल्या इंधनाच्या किमतीही वाढल्या आहेत.