सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2022 - 2023
Written By
Last Modified: मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (18:42 IST)

बजेट 2022: मोबाईल फोन, चार्जर आणि कपडे स्वस्त झाले

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. 
 
अर्थमंत्र्यांनी 2022-23 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्तावित केल्यानुसार, मोबाइल फोन आणि मोबाइल फोन चार्जरसह मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या वस्तू स्वस्त होणार. 

अर्थमंत्र्यांनी कृषी क्षेत्रासाठी भारतात उत्पादित साधने आणि उपकरणांवर सूट वाढविण्याची घोषणा केली. म्हणजेच आता शेतीमाल स्वस्त होणार आहे. याशिवाय कट आणि पॉलिश्ड हिऱ्यांवरील कस्टम ड्युटी बजेटमध्ये 5 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. म्हणजेच दागिने स्वस्त होतील. याशिवाय चामड्याच्या वस्तू आणि स्टील स्वस्त होणार आहे. बटणे, झिपर्स, लेदर, पॅकेजिंग बॉक्स स्वस्त होतील. श्रिम्प एक्वा कल्चरवरील शुल्क कमी करण्यात आले आहे.  
तर छत्री खरेदी महाग होईल. छत्र्यांवर कस्टम ड्युटी वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच भारतात बनवता येणारी आणि आयात करता येणारी औषधे महाग होणार आहेत. 
कापड, रत्नं आणि हिऱ्याचे दागिने, इमिटेशन दागिने, मोबाईल फोन्स, मोबाईल चार्जर्स , शेतीची साधने, स्वस्त होणार. तर सर्व आयात वस्तू , छत्र्या, मिश्रणाशिवाय इंधन हे महागणार.