बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2022 - 2023
Written By
Last Modified: मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (15:26 IST)

सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा केल्या,मात्र याचा महिला, शेतकरी आणि इतर वर्गाना दिलासा मिळाला आहे का ? हे पाहावे लागेल. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर ट्विट केले आहे.
 
देवेंद्र फडणवीस ट्विट मध्ये म्हणतात, भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे.सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निर्मला सितारामण यांचे खूप खूप आभार, अशा आशयाचे ट्विट केले आहे.