सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (22:16 IST)

UPI पेमेंट करताना सावधगिरी बाळगा,धोका होऊ शकतो,या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) एक आंतरबँक फंड ट्रान्सफर सुविधा आहे. याद्वारे फोन नंबर आणि व्हर्च्युअल आयडीच्या मदतीने पेमेंट केले जाते.
 
कोरोनाच्या काळात, भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) देशात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहेत. भारतातील लोक डिजिटल व्यवहारांसाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा भरपूर वापर करतात. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ही देशातील किरकोळ पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टमच्या कामकाजासाठी एक व्यापक संस्था आहे. हा रिझर्व्ह बँक आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) चा एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश भारतात मजबूत पेमेंट आणि सेटलमेंट फ्रेमवर्क तयार करणे आहे. NPCI चा युनिफाइड पेमेंट इंटरफेस एका मोबाईल .अप्लिकेशनला अनेक बँक खात्यांशी जोडून आर्थिक व्यवहार सुलभ करतो.
 
UPI म्हणजे काय?
यूपीआय म्हणजे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ही एक आंतरबँक फंड ट्रान्सफर सुविधा आहे, ज्याद्वारे फोन नंबर आणि व्हर्च्युअल आयडीच्या मदतीने स्मार्टफोनवर पेमेंट करता येते. हे इंटरनेट बँक निधी हस्तांतरणाच्या यंत्रणेवर आधारित आहे. ही प्रणाली NPCI द्वारे नियंत्रित आहे. वापरकर्ते काही मिनिटांत घरी बसून UPI ​​मधून पैसे हस्तांतरित करतात.
 
 
UPI किती सुरक्षित आहे?
पण प्रश्न असा आहे की, यूपीआय किती सुरक्षित आहे? डिजिटल व्यवहार ग्राहकांसाठी फायदेशीर तर आहेतच पण त्यांच्यासाठी धोकाही आहे. देशात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ऑनलाइन फसवणूक झपाट्याने वाढत आहे. सामान्य लोकांची फसवणूक करण्यासाठी हॅकर्स दररोज नवीन पद्धती वापरत आहेत. सायबर क्राइमच्या घटना दररोज समोर येत आहेत, ज्यात लोकांच्या खात्यातून लाखो रुपये गहाळ झाले आहेत. म्हणूनच आम्ही आपल्याला सुरक्षित व्यवहारांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्याद्वारे आपण  फसवणुकीला बळी पडणे टाळू शकता.
 
UPI पिन फक्त सुरक्षित अप्लिकेशनवर वापरा
हानिकारक अप्लिकेशन आपल्या फोनद्वारे आपली वैयक्तिक माहिती मिळवू शकतात. यात पेमेंटशी संबंधित माहिती देखील समाविष्ट आहे. आपण असे अप्लिकेशनचा वापर करणे टाळावे. आपला  UPI पिन जपून ठेवा कारण यामुळे फसवणूक होऊ शकते. सावधगिरीसाठी, UPI पिन फक्त BHIM UPI सारख्या सुरक्षित अप्लिकेशन वर वापरा. UPI पिन टाकण्यासाठी कोणत्याही वेबसाइट किंवा फॉर्ममध्ये लिंक असल्यास पिन टाकणे  टाळा. 
 
फक्त पैसे पाठवण्यासाठी UPI पिन प्रविष्ट करा
व्यवहार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला पैसे पाठवायचे असतील तेव्हाच UPI पिन टाकण्यास सांगितले जाईल. जर तुम्हाला कुठून पैसे मिळत असतील आणि त्यासाठी तुमच्याकडे UPI पिन मागितला जात असेल तर लक्षात घ्या की ही फसवणूक असू शकते.
 
फक्त ग्राहक सेवेशी संपर्क साधा 
जर आपल्याला पैशांचा व्यवहारात कोणतीही समस्या येत असेल आणि आपल्याला ग्राहक सेवेशी संपर्क साधण्याची आवश्यकता असेल तर फक्त पेमेंट अप्लिकेशनच वापरा. सत्यापित नसलेल्या इंटरनेटवर दिलेल्या फोन नंबरवर कॉल करू नका.
 
कोणालाही UPI पिन सांगू नका
आपला UPI पिन ATM पिन सारखाच आहे. त्यामुळे ते कोणाबरोबरही शेअर करू नका. असे केल्याने, फसवणूक करणारे त्याचा चुकीचा वापर करून आपली फसवणूक करू शकतात.