सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (08:30 IST)

ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन

पक्क्या अनुज्ञप्ती चाचणी चे स्लॉट बुकींग करण्यासाठी अर्जदारांनी सकाळी १०.०० वाजता अर्ज ऑनलाईन पध्दतीने http:/sarathi.parivahan.gov.in या संकेतस्थळावर सादर करावा. असे आवाहन मुंबई प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
 
प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे पक्क्या अनुज्ञप्ती चाचणीकरिता जास्तीत जास्त ९० दिवसांपर्यंत स्लॉट बुकींग करता येतो. पक्क्या अनुज्ञप्ती चाचणीकरीता असलेल्या ठराविक कोट्याकरिता उपरोक्त नमूद संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने प्राथम्याने सादर झालेल्या अर्जाचाच स्विकार संगणकाद्वारे केला जातो. ठराविक कोटा पूर्ण झाल्यानंतर त्या दिवसाकरिता ऑनलाईन स्लॉट बुकींग बंद होते. इच्छुकांनी सकाळी १०.०० वाजता प्राथम्याने आपला अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करावा.असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (मध्य) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.