लॉकडाऊनमध्ये केवळ एका फोटोने आधार कार्डचा पत्ता बदला, जाणून घ्या माहिती

Last Modified बुधवार, 29 एप्रिल 2020 (19:46 IST)
कोरोनाच्या संक्रमणकाळात लॉकडाऊन असल्यामुळे सगळे घरामध्ये बसले आहेत. आज आपली सर्व महत्त्वाची कामे अडकलीत आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचे काम आहे आपल्या आधार पत्रकामध्ये चुकीचा पत्ता असल्यास त्यामध्ये बदल करणे. होय आपणं घरी बसून देखील आपल्या आधार कार्ड किंवा पत्रकांमध्ये पत्ता सुद्धा बदलू शकता.
आधारासाठी त्याच्या अधिकृत संस्थे ने ट्विट करून सांगितले आहे की आपण घरात बसून देखील आपल्या आधार पत्रकामध्ये आपला पत्ता बदलू शकता. या साठी आपल्या जास्त काहीच करावयाचे नाही. फक्त आपल्याला आपला फोटो मोबाइलने काढून त्याला अपलोड करावं लागणार. UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वर एका व्हिडिओद्वारे याची सविस्तर माहिती दिली आहे. त्याला बघून आपल्याला सोप्यारीत्या आपला पत्ता अपलोड करू शकता.

ट्विट मध्ये माहिती दिली : UIDAI ने आपल्या ट्विट मध्ये सांगितले आहे की आपल्या सहाय्यक दस्तऐवजीचे (सर्पोटिंग डाक्युमेंट्स) चे रंगीत फोटो काढून आपल्या फोनने अपलोड करावं. या व्हिडिओमध्ये आपल्या घराचा पत्ता बदलविण्याच्या संदर्भात माहिती दिली आहे. UIDAI ने सांगितल्यानुसार सर्वात आधी https://uidai.gov.in/ वेबसाइटला भेट द्या आणि त्यामध्ये 'Address Update' वर क्लिक करावं. आपला पत्ता टाकावा आणि सहाय्यक दस्तऐवजाची कलर स्कॅन फाइल अपलोड करावं.

या प्रक्रियेचे अनुसरण करावं
: आपल्याला आपला ऑनलाईन पत्ता बदलण्यासाठी या https://uidai.gov.in/ संकेत स्थळावर जावे लागणार. त्या नंतर आपल्याला My Adhaar या टॅब वर क्लिक करावे लागेल.
आता आपल्याला ड्रॉपडाऊनच्या दुसऱ्या टॅब वर Update Your Aadhaar मध्ये जावे लागणार. येथे आपल्याला अजून एक तिसऱ्या ऑप्शनला Update Your Address Online ला क्लिक करावे.
या नंतर एक नवे पान आपल्या समोर येईल. या पानावर खालील बाजूला Proceed to Update Address वर क्लिक करा. या नंतर आपल्याला आपले आधार नंबर, captcha व्हेरिफिकेशन द्यावे लागतील. असे केल्याने आपल्याकडे ओटीपी नंबर येईल. हा ओटीपी नंबर देऊन लॉगिन वर जाऊन क्लिक करा.
या नंतर आपल्याला इथे Update Address Via Address Proof चे विकल्प मिळेल. या विकल्पाची निवड केल्यावर एका नवीन पानावर आपल्याला आपला नवीन पत्त्याची माहिती द्यावी लागणार.
ह्याचबरोबर आपल्याला काही महत्त्वाचे दस्तऐवजसुद्धा जमा करावे लागणार. आपल्या ऑनलाईन व्हेरिफिकेशन नंतर आपल्या आधार कार्डामधील पत्ता बदलविण्यात येईल. तसेच आपले नवीन आधार कार्ड आपल्या नव्या पत्त्यावर पोस्टाने पाठविण्यात येईल. अधिक माहितीसाठी आपण UIDAI च्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावे.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

निलेश राणे आणि रोहित पवार यांच्यात ट्विटर युद्ध

निलेश राणे आणि रोहित पवार यांच्यात ट्विटर युद्ध
भाजपा नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली ...

खडसे यांना दिलासा, तोपर्यंत ईडी अटक करण्याची कारवाई करणार ...

खडसे यांना दिलासा,  तोपर्यंत ईडी अटक करण्याची कारवाई करणार नाही
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द ...

'हे' आंदोलन म्हणजे केवळ एक पब्लिसिटी स्टंट : रामदास आठवले

'हे' आंदोलन म्हणजे केवळ एक पब्लिसिटी स्टंट  : रामदास आठवले
किसान सभेने मुंबईत केलेलं हे आंदोलन म्हणजे केवळ एक पब्लिसिटी संस्ट असल्याचा आरोप केंद्रीय ...

राजभवनाकडून खुलासा प्रसिद्ध, राज्यपाल अनुपस्थितीची दिली ...

राजभवनाकडून खुलासा प्रसिद्ध, राज्यपाल अनुपस्थितीची दिली होती पूर्वकल्पना
मुंबईत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून देण्यात येणारे निवेदन स्वीकारण्यासाठी राज्यपाल भगतसिंह ...

राज्य सरकारच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करा : मनसे

राज्य सरकारच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करा : मनसे
वाढीव वीज बिलाबाबत यूटर्न घेणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि राज्य सरकारच्या विरोधात ...