शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मार्च 2021 (15:16 IST)

सोन्याचे दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या 24K गोल्ड आणि 22K गोल्ड मधील फरक

सोन्याची खरेदी केवळ दागिने घालण्याचा शौक असल्यामुळे नव्हे तर गुंतवणूक म्हणून केली जाते. सोन्याच्या किमतीत चढ-उतार बघायला मिळतो. अशात सोनं खरेदी करताना 24K गोल्ड आणि 22K गोल्ड मधील फरक जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
 
कॅरेट म्हणजे काय
22 कॅरेट आणि 24 कॅरेट यातील फरक समजण्यापूर्वी आपल्याला माहीत असावे की कॅरेट म्हणजे नेमकं काय? हे सोन्याची शुद्धता मापण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द आहे. कॅरेट किंमत जितकी जास्त असेल, सोनं तेवढंच शुद्ध असतं. हे 0 ते 24 च्या प्रमाणात मोजले जाते. हे लक्षात घेता 24 कॅरेट सोनं सर्वात शुद्ध सोनं असतं जे खरेदी करणे फायद्याचे ठरतं. इतर धातू जसे तांबा, निकल, चांदी, पॅलेडियम यांना सोन्यासह जोडलं जातं ज्याने दागिन्याला मजबुती येते. या प्रकारे कॅरेट इतर धातूंसह सोन्याच्या गुणवत्ताचे माप देखील आहे.
 
24 कॅरेट सोन्याचे वैशिष्ट्य
हे शुद्ध सोनं आहे आणि याचे सर्व 24 भाग शुद्ध आहे अर्थात यात कुठलीही धातू मिसळलेली नाही. याचं रंग स्पष्ट रूपाने उज्‍ज्‍वल पिवळं असतं आणि हे इतर कोणत्याही प्रकारापेक्षा महाग असतं. अधिकश्या लोक या कॅरेटचे शिक्के किंवा बार खरेदी करणे पसंत करतात.
 
22 कॅरेट सोनं
याचा अर्थ दागिन्यात 22 भाग सोनं आहे आणि इतर 2 भाग इतर धातू आहे. या प्रकारे सोन्याचे दागिने तयार केले जातात कारण हे 24 कॅरेट सोन्याच्या तुलनेत कठोर असतं. तसेच नग जडित दागिन्यात 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जात नाही.
 
18 कॅरेट सोनं
या श्रेणीत 75 टक्के सोनं आणि 25 टक्के तांबा आणि चांदी असतं. हे इतर दोन श्रेण्यांच्या अपेक्षा स्वस्त असतं आणि हिरे तसेच स्टड याचे दागिने तयार करताना याचा वापर केला जातो. याचा रंग हलका पिवळा असतो. सोन्याची टक्केवारी कमी असल्यामुळे हे 22 किंवा 24 कॅरेट श्रेण्यांपेक्षा मजबूत असतं. म्हणून लाइटवेट आणि ट्रेंडी ज्वेलरी बनवण्यासाठी आणि नाजुक डिझाइन तयार करण्यासाठी हे सोनं वापरलं जातं. समान डिजायन तयार करण्यासाठी कमी कॅरेटचं सोनं उच्च कॅरेट पर्यायच्या अपेक्षा कमी वजनी असतं. या सोन्याची किंमत कमी असते कारण 18 कॅरेटमध्ये सोन्याचे प्रमाण कमी असतं. यामुळे दागिने हलके, किफायतशीर आणि अधिक टिकाऊ असतात. 
 
14 कॅरेट सोनं
ही श्रेणी 58.5 टक्के शुद्ध सोनं आणि शेष इतर धातूंची असते. भारतात हे अधिक चलनात नाही.गुंतवणूक करण्यासाठी 22 कॅरेट की 24 कॅरेट सोनं खरेदी करावं
जर आपण सोन्यात गुंतवणूक म्हणून खरेदी करू इच्छित असाल तर 24 कॅरेट सोनं खरेदी करावं. 24 कॅरेट सोन्यात 99.9 टक्के सोनं असतं जेव्हाकी 22 कॅरेट सोन्यात 91.7 टक्के सोनं असतं. जेव्हा आपण 24 कॅरेट सोन्याचा शिक्का किंवा बार खरेदी करता तेव्हा याची शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी नेहमी एक हॉलमार्क प्रमाण पत्र घ्यावं. बीआयएस हॉलमार्क असलेले ज्वेलरकडून सोने खरेदी करणे चांगले ज्याने आपल्याला हे विकताना उचित मूल्य प्राप्त होऊ शकेल.
 
दागिन्यांसाठी किती कॅरेट सोनं योग्य
हे या गोष्टीवर अवलंबून आहे की आपण दागिने दररोज घालणार आहात वा अधून-मधून. आपल्याला मजबूत दागिने हवे असल्यास कमी कॅरेटचे बनवणे योग्य ठरेल. दररोज सोन्याचे दागिने घालणार्‍यांसाठी 18 कॅरेट देखील योग्य ठरेल तसेच काही दागिने 22 कॅरेटचे असूनही रोज घालता येतात. रत्न धारण केलेले दागिने असल्यास 18 कॅरेट सोन्याचे दागिने बनवणे योग्य ठरेल.