शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: सोमवार, 11 जानेवारी 2021 (17:34 IST)

बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मधील फरक जाणून घ्या

आपण स्वयंपाकघरात अन्न शिजवताना कधी तरी आपल्या मनात हा प्रश्न उद्भवला असेल की बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मध्ये काय फरक आहे? बऱ्याच वेळा लोक असे म्हणतात की त्यांनी चुकून बेकिंग सोड्या ऐवजी बेकिंग पावडरचा वापर केला आणि नंतर तर समस्या झाली कधी ढोकळ्याचा रंग बदलला तर कधी भटोऱ्यात खमीरचं व्यवस्थित आले नाही. अशा परिस्थितीत काय करावे. जर आपल्याला ह्यांचा वापर करावयाचा आहे तर सर्वप्रथम वापर समजून घेणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊ या दोन्हीमध्ये काय फरक आहे.
 
* दोन्हीचा वापर का करतात ?
बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे दोन्ही यीस्ट करण्याच्या कामी येतात. हेच कारण आहे की दोघांच्या वापराबद्दल लोक गोंधळलेले असतात. हे जेव्हा जेव्हा एखाद्या पदार्थात घालतात तर ते फसफसून पदार्थात जाळी पाडून फ्लफी बनवतात.

* हे दोघे कशाने बनलेले आहेत? 
बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे दोन्ही एकाच कामी येतात, पण दोन्ही बनविण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. बेकिंग सोडा ज्याचे दुसरे नाव सोडियम बायकार्बोनेट आहे. या मध्ये आंबट घातल्यावर हे फुगते आणि पदार्थाला फ्लफी बनवते. यामध्ये ऍसिडिक माध्यम आहे जे हे काम करतो. 
जर आता आपण बेकिंग पावडर बद्दल बोलावं तर या मध्ये मुख्य घटक आहे बेकिंग सोडा. गोंधळला? होय बेकिंग पावडरच्या आत मुख्य घटक आहे बेकिंग सोडा यासह एक ऍसिडिक माध्यम आणि कॉर्न स्टार्च देखील मुख्य घटक आहे जे बेकिंग सोड्याला बेकिंग पावडर पेक्षा वेगळे बनवतात.
 
* कसं ओळखावं की कोणते बेकिंग सोडा आहे आणि कोणते बेकिंग पावडर -
बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मधील फरक ओळखण्याचे दोन पद्धत असू शकतात. पहिले हे की बेकिंग पावडर आपण बोटांच्या मध्ये ठेवल्यावर झटकारून दिल्यावर हे हाताला चिटकेल. आणि बेकिंग सोडा थोडा दाणेदार असतो आणि हे बोटांवर ठेवून चिटकत नाही. 
दुसरी पद्धत अशी आहे की बेकिंग पावडर मध्ये कोमट पाणी टाकल्यावर बुडबुडे येतात, परंतु बेकिंग सोड्यासह असे होत नाही ते पाणी मिळविल्यावर काही प्रतिक्रिया देत नाही त्याला आंबट माध्यम पाहिजे असते.
 
* कोणत्या खाद्य पदार्थात वापरावं बेकिंग सोडा ?
बेकिंग सोडा नेहमी त्याच पदार्थांमध्ये वापरतात ज्यांचा साठी इन्स्टंट फर्मानटेशन पाहिजे जसे भजे, ढोकळे इत्यादी जिथे फक्त बॅटर घोळल्यावर आपल्याला इंस्टेंट्ली किंवा 10 मिनिटातच अन्न शिजवायचे आहे. 
 
* कोणत्या डिशमध्ये बेकिंग पावडर वापरायचे आहे? 
बेकिंग पावडर वापरण्याची पद्धत वेगळी आहे. हे त्या पदार्थात वापरतात ज्यांच्या मध्ये यीस्ट देण्यासाठी थोडा वेळ मिळतो. जसं केक इत्यादींचे बॅटर तयार करायचे असो, किंवा भटोऱ्यांसाठी कणीक मळावयाची असो बेकिंग पावडरची पहिली प्रतिक्रिया त्याच वेळी मिळते जेव्हा ते घोळले जाते आणि दुसरी प्रतिक्रिया तेव्हा होते जेव्हा त्या पदार्थाला शिजवतात म्हणजे ओव्हन मध्ये किंवा गरम तेलात किंवा वाफवतात. बेकिंग पावडर नेहमी त्याच पदार्थात वापरावं ज्यामध्ये थोडी विश्रांती घ्यावयाचे आहे. असे बरेच पदार्थ आहे की ज्यांच्या मध्ये हे दोन्ही वापरतात जसे की ब्रेड किंवा पिझ्झ्याची कणीक.
 
* जर वापरायला काहीच साहित्य नाही तर - 
जर आपल्याला बेकिंग सोड्याची आणि बेकिंग पावडर ची गरज असून ते उपलब्ध नसल्यावर अशा परिस्थितीत दुसऱ्या साहित्याचा वापर करू शकतो परंतु त्याच्या वापर किती प्रमाणात करावयाचा आहे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.
1 चमचा बेकिंग पावडर च्या ऐवजी आपल्याला 1 चमचा बेकिंग सोड्यासह 1 चमचा लिंबाचा रस घालावयाचा आहे. 
जर एखाद्या रेसिपीमध्ये 1 चमचा बेकिंग सोडा लिहिले आहे तर त्याजागी 2 ते 3 चमचे बेकिंग पावडर घालावयाचे आहे. 
 
* हे कधी एक्स्पायर्ड होतात -
बेकिंग सोड्यामध्ये आपण थोडंसं व्हिनेगर घालून बघा जर ते बुडबुडे सोडू लागत असेल तर ते खाण्याच्या योग्य आहे. बेकिंग पावडर मध्ये गरम पाणी घातल्यावर बुडबुडे निघतात तर ते वापरण्याच्या योग्य आहे. जर या दोघांमध्ये असे काहीही होत नाही तर ते खराब आहे असं समजावं आणि त्यांना फेकून द्यावं.