शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (08:38 IST)

मसाले खराब होण्यापासून वाचविण्यासाठी हे उपाय करा

मसाले हे स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचे घटक आहे. त्यांच्या शिवाय अन्नाला चव देखील नसते. चविष्ट अन्नासाठी मसाल्यांचे योग्य प्रमाण आणि चांगला वास असणे महत्त्वाचे आहे. पण बऱ्याच वेळा असे बघितले आहे की हे मसाले लवकर खराब होऊ लागतात त्यामध्ये कीड लागतात. जर आपल्या स्वयंपाकघरात देखील अशी समस्या आहे तर या साठी आवश्यक आहे मसाल्यांच्या देखभाली साठी काही गोष्टींची काळजी घेणं. विशेषतः हिवाळ्यात आणि पावसाळ्याच्या हवामानात मसाले खराब होण्यापासून वाचवणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घ्या की असे कोणते उपाय आहेत ज्यामुळे मसाले खराब होण्यापासून वाचू शकतात.
*बऱ्याच वेळा बायका मसाले उजेड च्या ठिकाणी ठेवतात. त्यांना असे वाटते की उजेडात ठेवल्यावर मसाले खराब होणार नाही त्यांच्या मध्ये मॉइश्चर लागणार नाही, पण आपणास हे माहित नाही की मसाले जास्त उजेडात ठेवणे चांगले नाही.
* लोक खाण्या-पिण्याच्या वस्तूंना फ्रीजमध्ये साठवून ठेवतात, जेणे करून त्यांना बऱ्याच काळ वापरण्यात घेता येईल. काही लोक मसाले फ्रीज मध्ये ठेवतात, जे योग्य नाही. मसाले फ्रीज मध्ये ठेवल्याने त्यांची चव खराब होते. आपली इच्छा असल्यास मसाले हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता.
* आवश्यक असल्यास मसाले गरज असेल तेव्हाच वाटून घ्या. जास्त प्रमाणात मसाले वाटू नये, कारण अक्खे आणि खडे मसाले लवकर खराब होत नाही. मसाले नेहमी पारदर्शक डब्याऐवजी  गडद रंगाच्या जार मध्ये ठेवा, ज्यामुळे लाइट कमी पडते. या शिवाय काचेच्या बरणीत देखील मसाले ठेवू शकता. त्यांना फक्त अंधारात ठेवा. 
* मसाल्यांमध्ये मॉइश्चर आले असेल तर त्यांना उन्हात ठेवा. परंतु  कधीही थेट सूर्यप्रकाशात ठेवू नये. एका ताटलीत मसाले ठेवा आणि एखाद्या कपड्याने झाकून ठेवा.