शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (13:27 IST)

MDH मसालेचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन

मसाल्यांचा बादशाह म्हणून प्रसिद्ध ‘एमडीएच’ मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं आहे. ते ९८ वर्षांचे होते. ‘एमडीएच’ मसाले हा एक मोठा नावाजलेला ब्रँड आहे. 
 
गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये मागील तीन आठवड्यांपासून उपचार सुरु होते. आज पहाटे वृद्धापकाळानं ह्रदय बंद पडून त्यांचं निधन झालं. 
 
महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे झाला होता. नंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले आणि त्यांनी मसाल्यांचा उद्योग सुरु केला. ‘महाशियां दी हट्टी’ ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी ‘एमडीएच’ या नावाने प्रसिद्ध आहे.
 
२०१९ साली गुलाटी यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच पद्म विभूषण प्रदान करुन सन्मानित करण्यात आलं होतं. गुलाटी हे त्यांच्या वैयक्तिक कमाईतील ९० टक्क्यांहून अधिक हिस्सा दान म्हणून द्यायचे. 
 
यापूर्वीही अनेकदा गुलाटी यांच्या मृत्यूसंदर्भातील अफवा इंटरनेटवर व्हायरल झाल्या आणि काही महिन्यांपूर्वीच गुलाटी यांनी आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे पत्रक काढून सांगितलं होतं.