बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 2 डिसेंबर 2020 (13:34 IST)

नोव्हेंबरमधील ‘जीएसटी' 1 लाख 4 हजार कोटींवर

नोव्हेंबर महिन्यातील जीएसटी कलेक्शन 1 लाख 4 हजार कोटी रुपयांवर गेले आहे. गेल्या महिन्याइतकेच हे कलेक्शन आहे. गेल्या महिन्यात 1 लाख 5 हजार कोटी रुपये इतके कलेक्शन झाले होते. 
 
सन 2019 च्या नोव्हेंबर महिन्यातील कलेक्शनची तुलना करता या नोव्हेंबर महिन्यातील कलेक्शन 1.4 टक्क्याने अधिक आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये 1 लाख 3 हजार 491 कोटी रुपये इतके जीएसटी कलेक्शन झाले होते.

त्याचप्रमाणे आयात मालावरून मिळणार्याक जीएसटीमध्ये यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात गेल्या   वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत 4.9 टक्के वृद्धी झाली आहे तर अंतर्गत व्यवहारांतील जीएसटी कलेक्शनमध्ये 0.5 टक्के इतकी वृद्धी झाली आहे.