शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (12:56 IST)

चीनने ३० वर्षात प्रथमच भारतीय तांदळाची आयात सुरु केली

भारत हा जगातील सर्वाधिक तांदूळ निर्यातदार देश आहे तर चीन सर्वाधिक तांदूळ आयातदार देश आहे. चीन थायलंड, व्हीएतनाम, म्यानमार, पाकिस्तान या देशातून नेहमी तांदूळ आयात करतो पण यंदा चीनने ३० वर्षात प्रथमच भारतीय तांदळाची आयात सुरु केली असल्याचे समजते. 
 
चीन दरवर्षी ४० लाख टन तांदूळ आयात करतो. गेली काही वर्षे चीनने भारतातून तांदूळ आयात केला नव्हता कारण भारताच्या तांदूळ गुणवत्तेबद्दल चीन संतुष्ट नसावा. 
 
तांदूळ निर्यात असोसिएशनच्या माहितीनुसार फेब्रुवारी पर्यंत १ लाख टन तांदूळ निर्यातीचा करार झाला असून हा तांदूळ ३०० डॉलर्स प्रती टन या दराने निर्यात होत आहे.
 
सध्या भारत -चीन मध्ये सीमा तणाव असून भारताने चीनच्या एकूण २०० अॅप्सवर बंदी घातली आहे त्यामुळे राजकीय संबंध सुद्धा ताणले गेले आहेत.