गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (10:24 IST)

100 वर्षीय महिलेवर दुष्कर्म, दोषीला जन्मठेपेची शिक्षा

Meerut man gets life term for attempting to rape 100-year-old Dalit woman
उत्तर प्रदेशच्या मेरठमधील 100 वर्षीय महिलेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी तीन वर्षांनंतर दोषीला शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने या प्रकरणात दोषी असलेल्या अंकित पूनिया याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
 
2017 मध्ये दोषीने वयोवृद्ध दिव्यांग महिलेवर अत्याचार केला होता. नंतर पीडितेचा मृत्यू झाला होता. महिलेच्या नातवाने खटला दाखल केला होता. त्याचा ‍निकाल तीन वर्षांनी लागला आहे.
 
काय घडलं होतं-
एका 100 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची कथित घटना घडल्यामुळे उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये खळबळ उडाली होती. अत्याचाराची शिकार झालेल्या वृद्ध दलित महिलेने उपचारादरम्यान हॉस्पिटमध्ये शेवटचा श्वास घेतला होता. 
 
महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार ही वृद्ध महिला आजारी असून आपल्या व्हरांड्यात झोपली होती. रात्री कण्हण्याचा आवाज आल्यानंतर घरातील सर्वजण बाहेर आले तेव्हा त्यांना धक्काच बसला. बाहेर गावातील एक ३५ वर्षीय व्यक्ती या वृद्ध महिलेवर अत्याचार करत होता. तो नशेत होता. 
 
घरातील सर्वजण बाहेर आल्यानंतर अंकित पूनिया घटनास्थळावरून पळून गेला. नंतर कुटुंबीयांनी अॅम्ब्युलन्स बोलावून पीडित महिलेला पोलिस ठाण्यात नेलं. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.