गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: सोमवार, 4 जानेवारी 2021 (12:09 IST)

फ्रीजमध्ये अंडी ठेवता, मग या 5 गोष्टी जाणून घ्या

Egg Storage
लहानपणा पासून आपण घरातील वडिलधाऱ्यांचे हे म्हणणे ऐकलेच असेल की हिरव्या पालेभाज्या आणि दुधाचे पदार्थ फ्रीज मध्ये ठेवल्याने ते जास्त काळ खराब होत नाही. पण आपल्याला हे माहित आहे का ही गोष्ट अंड्यांसाठी लागू नाही. फ्रीज मध्ये ठेवलेले अंडी हे आपले आरोग्य बिघडवू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 संसर्ग होण्याचा धोका- 
बऱ्याच वेळा अंडींच्या सालांवर बाहेरची घाण लागलेली असते. ज्यामुळे फ्रीज मध्ये ठेवल्याने इतर पदार्थांमध्ये देखील संसर्ग पसरण्याचा धोका असतो. हेच कारण आहे की अंडी फ्रीज मध्ये ठेवणे टाळावे.
 
2 फ्रीज बाहेर ठेवलेली अंडी जास्त आरोग्यवर्धक आहे -
आपल्याला हे जाणून आश्चर्य होईल की फ्रीज मध्ये ठेवलेली अंडी बाहेरच्या अंडींपेक्षा जरी जास्त दिवस चांगले राहत असेल तरी फ्रीज मध्ये ठेवलेली अंडी जास्त थंड झाल्यामुळे आपले पोषक घटक गमावतात. अशा परिस्थितीत जर आपण आरोग्याबद्दल सज्ज आहात तर हे जाणून घ्या की खोलीच्या तापमानात ठेवलेली अंडी, फ्रीज मध्ये ठेवलेल्या अंडींच्या तुलनेत जास्त आरोग्यदायी आहे.
 
3 बॅक्टेरियांचा धोका-
अंडींना फ्रीज मध्ये ठेवल्यावर त्यांना सामान्य तापमानात ठेवल्याने कंडेनसेशन म्हणजे गॅस मधून द्रव होण्याची प्रक्रिया ची शक्यता वाढते. कंडेनसेशनमुळे अंडींच्या सालींवरील असलेले बॅक्टेरिया झपाट्याने वाढतच नाही तर अंडींच्या आत देखील प्रवेश करू शकतात. अश्या अंडींचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

4  तापमान - 
जर आपण अंडींचा वापर बेकिंग उत्पादन साठी करू इच्छिता तर हे फ्रीज मध्ये ठेवू नये. कारण  फ्रीज मधील ठेवलेल्या अंडींना फेणायला त्रास होतो. एवढेच नव्हे तर फ्रीज मधील ठेवलेल्या अंडींना वापरल्याने त्यांच्या चवीमध्ये आणि रंगात बदल होऊ शकतो.

5 तुटण्याची भीती -
बाजारातून आणलेले अंडी त्वरितच उकडण्यासाठी ठेवल्याने त्यांची फुटायची भीती कमी असते. तर फ्रीज मधील अंडींना उकडल्याने ती अंडी फुटायची भीती असते.