शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जून 2020 (20:54 IST)

अभिनेते जगेश मुकाटी यांचे निधन

‘अमिता का अमित’, ‘श्रीगणेश’ यांसारख्या मालिका व ‘हंसी तो फसी’, ‘मन’ या चित्रपटांत भूमिका साकारणारे अभिनेते जगेश मुकाटी (४७)  यांनी १० जून ला अखेरचा श्वास घेतला.दीर्घ काळापासून अस्थमाचा आजार होता.
 
जगेश मुकाटी यांनी अनेक हिंदी आणि गुजराती मालिकांमध्ये काम केलं. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतही काम करून त्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली. गुजराती रंगभूमीवर अभिनेते जगेश मुकाटी स्वतःची वेगळी ओखळ निर्माण केली होती आणि अनेक टीव्ही मालिका आणि हिंदी-गुजराती चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.  त्यांना धीरज कुमार यांची निर्मिती असलेल्या ‘श्रीगणेश’ या मालिकेतील गणेशाच्या मुख्य भूमिकेतून लोकप्रियता मिळाली होती. अनेक जाहिरातींमध्येही ते दिसले. अलीकडेच ते ‘चाल जीवी लईए’ या गुजराती चित्रपटात झळकले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.