गुरूवार, 6 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 10 जून 2020 (20:20 IST)

WWE ची कॉमेंट्री आता हिंदीमध्ये

WWE commentary in Hindi
WWE हा स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय शो म्हणून ओळखला जातो. आता  WWE ची कॉमेंट्री आता  इंग्रजी ऐवजी हिंदी भाषेत ऐकायला मिळणार आहे.
 
WWE चे ब्रॉडकास्ट हक्क सोनी पिक्चर्स स्पोर्ट एंटरटेन्मेंट या मीडिया कंपनीने विकत घेतले आहेत. सुरुवातीला ‘रॉ’ आणि ‘स्मॅकडाउन’ हे दोन शो त्यांनी प्रायोगिक तत्वावर हिंदीमध्ये प्रदर्शित करण्यास सुरुवात केली होती. या प्रयोगाला प्रेक्षकांचा खुप चांगला प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहून आता WWE NXT, WWE स्पेशल इव्हेंट, WWE सुपरस्टार, रेसलमेनिया हे सर्व शो आणि सर्व मोठ्या स्पर्धा हिंदीमध्ये ब्रॉडकास्ट केल्या जाणार आहेत. WWEच्या हिंदी पर्वाची सुरुवात येत्या १५ जूनपासून होणार आहे.