1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जून 2020 (14:52 IST)

PAN कार्ड शिवाय हे काम शक्य नाही, जाणून घ्या का महत्त्वाचे आहे पॅन कार्ड

PAN card
सध्याच्या काळात कोणत्याही वित्तीय किंवा बँकांशी निगडित कामासाठी कायम खाता क्रमांक /पर्मनंट अकाउंट नंबर (PAN ) ची गरज असते. जर आपल्याकडे पॅन क्रमांक नाही तर आपण आर्थिक आणि बँकांशी निगडित व्यवहार करू शकतं नाही. म्हणून आयकर विभागाने पॅन कार्ड बनविणे जरुरी सांगितले आहे. हेच नव्हे तर 30 जून पूर्वी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक देखील करावयाचे आहे. जेणे करून पॅन कार्ड रद्द होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या कामासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे ते.....
 
* हे आयकर विभागातून प्राप्त होतं- 
पॅन क्रमांक हा 10 अंकीय असतो आणि ह्याला आयकर विभाग जारी करतो. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पॅन क्रमांक अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. या व्यतिरिक्त 
 
बँकेशी निगडित इतर कामासाठी पॅन कार्ड किंवा पॅन क्रमांक असणे आवश्यक आहे. 
जर आपल्याला पाच लक्ष रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीची अचल मालमत्ता विकत घ्यावयाची असेल तर यासाठी देखील पॅन क्रमांक लागणार. प्राप्तिकर किंवा आयकराच्या अधिकृत संकेत स्थळांवर हे सर्व नियम आणि मार्गदर्शक सूचना स्पष्टपणे दिल्या गेल्या आहेत. 
 
* इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पॅन आवश्यक- 
आयकर विभागाने रिटर्न भरण्यासाठी पॅन क्रमांकाला बंधनकारक केले आहेत आणि आता रिटर्न भरण्याआधी आधार आणि पॅन कार्डला लिंक करणे गरजेचे आहे. जर असे केले नाही तर रिटर्न भरता येणार नाही. आयकर विभागानुसार बँक ड्रॅफ्टच्या रोख खरेदीसाठी पे ऑर्डर किंवा एका दिवसात 50,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त बँकर्स चेक देण्यासाठी देखील पॅन कार्ड देणे बंधनकारक आहे. 
 
* जीवन विमाच्या प्रिमियमसाठी पॅनची गरज- 
जीवन विम्याच्या प्रिमियम मध्ये देखील 50,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पैसे दिल्यावर आपल्याला आपल्या पॅन क्रमांकाची माहिती द्यावी लागते. जर बाजारपेठेत पैशाची गुंतवणूक करायची असेल किंवा कंपनीचे शेअर्स विकत घ्यावयाचे असल्यास त्यासाठी पॅन कार्डाची गरज असते. विशेष करून जेव्हा आपण त्या कंपनीला शेअर्सच्या बदल्यात 50,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम देत असल्यास. कंपनीचे डिबेचर आणि बॉण्ड खरेदीसाठी देखील पॅन देणे बंधनकारक आहे. 
 
* पोस्ट ऑफिसात पैसे जमा करण्यासाठी- 
पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये 50,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रोख रक्कम जमा करण्यासाठी पॅन क्रमांक देणे बंधनकारक आहे. क्रेडिट किंवा डेबिट कार्डाच्या आवेदनासाठी देखील पॅनकार्ड दिले जाते. ज्या मधून आपल्या आर्थिक व्यवहाराची माहिती मिळवली जाते. हॉटेल आणि रेस्तराँ मध्ये 25000 रुपये पेक्षा जास्त च्या बिलासाठी देखील पॅन कार्ड क्रमांक देणे बंधनकारक आहे.
 
* म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी- 
1 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सिक्युरिटीज आणि म्युच्युअल फंड युनिट्स विकत घेण्यासाठी देखील पॅन क्रमांक अनिवार्य केले आहे. त्याची मर्यादा 50,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम भरण्यावर आहे. वित्तीय संस्थांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट किंवा टाइम डिपॉझिट योजनेमध्ये 50,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.