OTP म्हणजे काय असतं? कुठे आणि का वापरलं जातं जाणून घ्या संपूर्ण माहिती

Last Updated: बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (11:22 IST)
म्हणजे वन टाईम पासवर्ड. ओटीपी हा एक सुरक्षा कोड आहे, जो ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरला जातो. ऑनलाईन बँकेचा व्यवहार असो किंवा ऑनलाईन डेबिट किंवा क्रेडीट कार्डाने देय देणे असो, ओटीपी ने व्हेरिफाय करणं महत्वाचं असतं. ओटीपी हे 4 ते 8 अंकी एक सुरक्षा कोड असतो. जे व्हेरिफाय करण्यासाठी आपल्या मोबाईलनंबर वर मॅसेज रूपात येतं. ओटीपी ला आपण एक Security Password देखील म्हणू शकतो, हे नेहमी रिक्वेस्ट केल्यावर आपोआप तयार होतं. हे प्रत्येक वेळी वेगवेगळं असतं. याचा अर्थ असा आहे की ओटीपी हा एक युनिक कोड आहे.

ऑनलाईन देय व्यवहार करणारे अ‍ॅप साठी ओटीपी वापरण्यात येतं. ई- कॉमर्स च्या साईट्सवर नवीन खाते उघडण्यासाठी देखील आपल्या मोबाइलला ओटीपी ने व्हेरिफाय म्हणजे सत्यापित केलं जातं.
सध्याच्या काळात प्रत्येक वेबसाईट किंवा संकेत स्थळावर जिथे ऑनलाईन ट्रॅान्जेक्शन करण्यासाठी किंवा सुरक्षिततेची जास्त गरज असल्यावर मोबाइल नंबर किंवा ई मेल हे ओटीपी ने सत्यापित केले जाते.

ओटीपीची गरज कशाला?
आजकाल सर्व काही काम ऑनलाईन होत आहे, म्हणून कोणत्याही प्रकारच्या अकाउंटसाठी हे सुरक्षेच्या दृष्टींने महत्वाचं असतं. मग ते खातं ऑनलाईन खरेदीसाठीचा असो किंवा ऑनलाईन बँकिंगचा असो, सुरक्षितता सर्वात जास्त महत्वाची आहे.
जर आपलं युजर नेम आणि पासवर्ड एखाद्याकडे असल्यावर ही तो आपल्या खात्यामधून देय करू शकत नाही कारण ट्राजेक्शन करण्यासाठी OTP Verification करणं महत्वाचं आहे. ऑनलाईन फिशिंग किंवा सायबर ठगी होण्यापासून वाचण्यासाठी ओटीपी चे सत्यापन गरजेचं आहे.

सध्या पासवर्ड किंवा युजरनेम हॅकिंग करण्याचा धोका वाढतच आहे. म्हणून शेवटची स्टेप म्हणजे ओटीपी व्हेरिफिकेशनची आहे, ज्यामुळे पासवर्ड चोरी झाल्यावर सुद्धा आपले खाते सुरक्षित राहणार.

गुगल देखील युजर्सच्या खात्याला सुरक्षित राखण्यासाठी ओटीपी व्हॅरिफिकेशन करतं.

आजच्या इंटरनेटच्या काळात डेटा सुरक्षित ठेवणं सर्वात महत्वाचा काम आहे आणि ओटीपी व्हेरिफिकेशन सर्वात चांगली सुरक्षा आहे. OTP दरवेळी बदलला जातो जेणेकरून आपले खाते पूर्णपणे सुरक्षित ठेवते.

ओटीपी कोणाशीही शेअर करू नये
OTP कोड केवळ एकदाच वापरला जातो. बँकेच्या नावाने OTP साठी कॉल आल्यावरही कोणत्याही अटीवर OTP सांगू नये. OTP कोणाबरोबर शेअर करू नये. ओटीपीविषयी माहिती मिळवणे गुन्हा मानले जाते. अनेकदा यूजरचं खातं असलेल्या बॅंकेत ओटीपी हवा आहे, असं खोटं सांगून ओटीपी मागितला जातो. पण खरी गोष्ट अशी की, कोणतीही बँक आपल्या ग्राहकांकडे OTP मागत नाही. मोबाईल, ई-मेल किंवा अन्य कुठेही आलेला ओटीपी कधीही कोणालाही सांगू नये.
पेमेंट करताना सतर्क रहावे
ओटीपीच्या माध्यमातून व्यवहार करताना नेमका किती रुपयांचा व्यवहार केला जात आहे तसेच त्या पेजचा स्रोत आणि देण-घेण व्यवहाराकडे कडे लक्ष ठेवावे. ते विश्वसनीय असल्याची खात्री करुन घ्यावी. काहीही चुकीचं किंवा अव्यवहारिक आढळत असल्यास लगेच पेमेंट रद्द करावे.

पैसे घेण्यासाठी ओटीपीची गरज नसते
ओटीपी फक्त पैसे देताना लागतो. पैसे घेत असताना ओटीपीची गरज पडत नाही. अनेकदा यूजरला पैसे पाठवत असल्याचं लालूस देऊन ओटीपी मागतिला जातो हे फ्रॉड आहे आणि खोटं सांगूनही ओटीपी उकळला जातो. मात्र, पैसे देणार्‍याकडे ओटीपी येत असतो स्विकार करणार्‍याकडे नव्हे म्हणून अशात आपली फसवणूक होण्याची पूर्णपणे शक्यता असते.
स्त्रोत अधिकृत असावे
पैसे भरताना फक्त अधिकृत अॅप्स किंवा वेबसाइटचा वापर करावा. अॅप किंव साईट अधिकृत नसल्यास ओटीपी ट्रॅक होऊन पैशाची चोरी केली जाते. या व्यतिरिक्त खासगी माहिती देखील लिक होते.

कस्टमर केअरशी संपर्क करताना काळजी घ्या
बॅंक अकाउंटसंबंधी किंवा डिजिटल व्यवहार करताना कुठलीही शंका असल्यास नेहमी अधिकृत कस्टमर केअरशी संपर्क करावा. अनाधिकृत नंबरवर आपली समस्या सांगितल्यावर फसवणूकीची शक्यता अधिक असते. अनाधिकृत नंबरवर संपर्क झाल्यास डाटा चोरी केला जाऊ शकतो. अनेकदा सर्च इंजिनवर सापडणारे कस्टमर केअर नंबर खोटे असतात.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Mumbai :CNG सहा रुपयांनी तर PNG चार रुपयांनी स्वस्त

Mumbai :CNG सहा रुपयांनी तर PNG चार रुपयांनी स्वस्त
मुंबई महानगर गॅस लिमिटेडकडून इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत.यामध्ये ...

राकेश झुनझुनवाला यांच्यानंतर ४६ हजार कोटींची मालकी कुणाकडे?

राकेश झुनझुनवाला यांच्यानंतर ४६ हजार कोटींची मालकी कुणाकडे?
बिग बुल राकेश झुनझुनवालाने खूप मोठे साम्राज्य मागे सोडले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी रेखा ...

रुपी बँक पुणे बाबत खासदार बापटांनी दिले सहकार मंत्री अमित ...

रुपी बँक पुणे बाबत खासदार बापटांनी दिले सहकार मंत्री अमित शहांना पत्र
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पुणेस्थित रुपी सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. ...

Gondia :गोंदियामध्ये मालगाडीला पॅसेंजर ट्रेनची धडक, 50 हून ...

Gondia :गोंदियामध्ये मालगाडीला पॅसेंजर ट्रेनची धडक, 50 हून अधिक प्रवासी जखमी
Maharashtra Gondia train accident: महाराष्ट्रातील गोंदियामध्ये रेल्वे अपघाताची घटना समोर ...

सत्ता आली म्हणजे मस्ती आली का तुम्हाला?, अजित पवार यांनी ...

सत्ता आली म्हणजे मस्ती आली का तुम्हाला?, अजित पवार यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला
शिंदे गटातील एक आमदार महाराष्ट्रात संघर्ष पेटावा अशी भाषा करत आहेत. शिवसैनिकांना ठोकून ...