गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Updated : रविवार, 29 मे 2022 (13:40 IST)

आधार कार्डबाबत केंद्राची नवीन सूचना, फोटोकॉपी शेअर करताना हे लक्षात ठेवा

aadhar card
आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज आहे. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेणे असो किंवा आर्थिक व्यवहार करणे असो आज अनेक महत्त्वाच्या कामांसाठी या कार्डाची आपल्यासाठी विशेष उपयुक्तता आहे. आधार कार्ड हा तुमच्या ओळखीचा पुरावा आहे. त्यात 12 अंकी संख्यात्मक अंक असतात. हे अंकीय क्रमांक तुमची बायोमेट्रिक ओळख सुनिश्चित करण्यासाठी कार्य करतात. अशा परिस्थितीत आधार कार्ड वापरताना अनेक गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. अनेकदा आपण आपल्या आधार कार्डची प्रत कोणाहीसोबत कुठेही शेअर करतो. तुम्हीही ही चूक करत असाल तर तुम्ही ताबडतोब सावध व्हायला हवे. तुमच्या या निष्काळजीपणामुळे मोठे नुकसान होऊ शकते. याबाबत सरकारने इशारा दिला आहे. आपल्या मार्गदर्शक तत्त्वात सरकारने फक्त मास्कड आधार कार्ड इतर लोकांसोबत शेअर करण्यास सांगितले आहे.
 
आधार कार्डची प्रत कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला शेअर केल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो, असे सरकारने सांगितले आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. लोकांना मार्गदर्शक तत्त्वे देताना सरकारने म्हटले आहे की, नेहमी फक्त मास्कड आधार कार्ड इतर लोक किंवा संस्थांसोबत शेअर करा. 
 
मास्कड आधार कार्ड काय आहे
तुमच्या 12 अंकी संख्यात्मक कोडची पूर्ण संख्या मास्कड आधार कार्डमध्ये दिसत नाही. मास्कडआधारमध्ये, आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे 4 अंक दिसतात. तुम्ही मास्कड आधार कार्ड ऑनलाइन सहजरित्या डाउनलोड करू शकता.
 
सायबर कॅफेमधून आधार कार्ड डाउनलोड करू नका
सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही कधीही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू नये. जर तुम्ही सायबर कॅफेला भेट देऊन तुमचे आधार कार्ड डाउनलोड करत असाल, तर अशा परिस्थितीत तुम्ही संगणकातील आधार कार्डची डाउनलोड केलेली फाईल कायमची डिलीट करावी.
 
मास्कड आधार कार्ड कसे डाउनलोड करावे
जर तुम्हाला मास्कड आधार कार्ड डाउनलोड करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जाऊन 'आधार डाउनलोड करा' हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर 'Aadhaar/VID/Enrollment ID' या पर्यायावर क्लिक करा आणि 'मास्कड आधार कार्ड' या पर्यायावर क्लिक करा.
 
यानंतर, तुम्हाला काही महत्त्वाची माहिती जसे की आधार क्रमांक इत्यादी भराव्या लागतील आणि नंतर 'OTP विनंती' या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक वन टाईम पासवर्ड येईल, म्हणजेच आधार कार्डशी लिंक केलेला नंबर, जो तुम्हाला टाकावा लागेल. त्यानंतर 'आधार डाउनलोड करा' वर क्लिक करा. असे केल्याने तुमचे मास्कड आधार कार्ड सहज डाउनलोड केले जाईल.