बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: बुधवार, 31 जुलै 2024 (13:37 IST)

ITR भरण्याची शेवटची तारीख आज, इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं?

income tax return
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ येतेय. 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचा इन्कम टॅक्स भरण्यासाठीची शेवटची तारीख 31 जुलै आहे.
 
टॅक्स रिटर्न या मुदतीत भरणं अनिवार्य आहेच पण फक्त रिटर्न भरून चालणार नाही. एकदा टॅक्स भरला की त्याचं इ-व्हेरिफिकेशन दिलेल्या वेळेत करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.
 
रिटर्न भरणाऱ्या लोकांसाठी इ- व्हेरिफिकेशन करण्यासाठीची तारीख इन्कम टॅक्स विभागाकडून देण्यात येते. आधी ही मुदत 120 दिवस होती. आता ती अवघ्या 30 दिवसांवर आणून ठेवली आहे.
 
जर टॅक्स भरणाऱ्यांनी रिटर्न भरला आणि व्हेरिफिकेशन केलं नाही तर त्यांचा रिटर्न ग्राह्य धरला जात नाही.
इ-व्हेरिफिकेशन साठी काय लागतं?
डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र
आधार ओटीपी
व्हेरिफिकेशन कोड किंवा डिमॅट अकाऊंटचा वापर करून इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन
नेट बँकिंगने सुद्धा हे करता येतं.
आधार ओटीपीने इ- व्हेरिफाय कसं कराल?
इ-व्हेरिफाय पेजवर गेल्यावर I would like to verify using OTP Mobile number with Aadhar’ वर क्लिक करा आणि पुढे जा.
आता आधार ओटीपी पेजवर ‘I agree to verify my Aadhar Details’ वर क्लिक करा आणि आधार ओटीपी फिचर जनरेट करा.
त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सहा आकडी ओटीपी क्रमांक येईल तो टाका आणि व्हेरिफाय हे बटन दाबा.
हे झाल्यानंतर ट्रान्झॅक्शन आयडी आणि व्हेरिफिकेशन यशस्वी झाल्याचा मेसेज येईल. ट्रान्झॅक्शन आयडीचं पेज दिसेल. ट्रान्झॅक्शन आयडीची नोंद करा. रिटर्न व्हेरिफिकेशन झाल्याचा मेसेज मोबाइलवर आणि इमेल आयडीवर येईल.
 
ऑनलाइन बँकिंगचा वापर करून इ- व्हेरिफाय कसं करायचं?
इ- व्हेरिफाय या पेजवर जाऊन Through Net banking लिंकवर जा आणि पुढे जा.
 
इ- व्हेरिफायसाठी बँक निवडा आणि पुढे जा.
तिथे असलेलं डिस्क्लेमर वाचा आणि पुढे जा.
त्यानंतर बँक अकाऊंटचं नेट बँकिगचं लॉगइन पेज येईल.
युझर आयडी पासवर्ड वापरून लॉगइन करा.
बँकेच्या वेबसाइटवर इ-फायलिंगचं फीचर असेल, तिथे क्लिक करा.
आता इंटरनेट बँकिग बंद होऊन इ-फायलिंग पोर्टल उघडेल
लॉगइन केल्यावर इ-फायलिंगचा डॅशबोर्ड उघडेल.
आता आयटीआर/फॉर्म/सर्व्हिस वर जा आणि इ-व्हेरिफायवर क्लिक करा. तुमचा आयटीआर/फॉर्म/सर्व्हिस लगेच व्हेरिफाय होईल.
त्यानंतर ट्रान्झॅक्शन आयडी उघडेल. तो नोंदवून ठेवा.
एटीएम कार्ड वापरून इ-व्हेरिफाय कसं कराल? (ऑफलाइन मोड)
तुमच्या बँकेच्या एटीएममध्ये जा आणि कार्ड स्वाइप करा (काही बँका एटीएममधून व्हेरिफिकेशन साठी EVC म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड सुद्धा देतात)
आता PIN टाका.
Generate Electronic Verification Code (EVC) for Income Tax Filing या पर्यायावर क्लिक करा.
EVC तुमच्या मोबाइल नंबर आणि रजिस्टर्ड इमेल आयडीवर पाठवला जाईल. (सूचना- जे पॅन कार्ड बँकेला लिंक आहे तेच पॅन कार्ड इ-फायलिंग पोर्टललला जोडलेलं असावं.)
 
EVC नंबर अक्सिस बँक, कॅनडा बँक, आयसीआयसीआय, आयडीबीआय, कोटक महिंद्रा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएम येथे मिळतो.
 
I already have EVC हा पर्याय निवडा. EVC नंबर टाकून रिटर्न इ- व्हेरिफाय करता येतो.
 
तुमच्याकडे EVC असेल तर इ- व्हेरिफाय कसं कराल?
इ- व्हेरिफाय पेजवर 'I already have EVC' या पर्यायावर क्लिक करा.
EVC टाका आणि पुढे जा.
त्यानंतर एक पेज येईल. तिथे ट्रान्झॅक्शन आयडी आणि व्हेरिफिकेशन झाल्याची माहिती टाका. ट्रान्झॅक्शन आयडी नोट करा.
हे झाल्यावर मोबाइल नंबरवर एसएमएस आणि इमेल आयडीवर मेल येईल.
बँक अकाऊंटमधून EVC कसा तयार कराल?
इ-व्हेरिफाय पानावर 'Via Bank Account' वर क्लिक करा आणि पुढे जा. (सूचना- EVC असलेल्या बँक अकाऊंटमध्ये बँकेत नोंदवलेला इमेल आयडी आणि फोन नंबर येईल.)
इमेल आयडी आणि मोबाइल नंबर टाका, 'Enter EVC' मध्ये EVC टाका आणि व्हेरिफाय वर क्लिक करा.
त्यानंतर एक पेज येईल. तिथे ट्रान्झॅक्शन आयडी आणि व्हेरिफिकेशन झाल्याची माहिती टाका. ट्रान्झॅक्शन आयडी नोट करा.
त्यानंतर व्हेरिफिकेशन यशस्वी झाल्याची माहिती मोबाइल नंबर आणि इमेलवर येईल.
डिमॅट अकाऊंट असेल तर EVC कसा तयार करायचा?
इ-व्हेरिफाय पानावर 'Through Demat Account' वर क्लिक करा आणि पुढे जा. . (सूचना- EVC असलेल्या डिमॅट अकाऊंटमध्ये बँकेत नोंदवलेला इमेल आयडी आणि फोन नंबर येईल.)
डिमॅट अकाऊंटसाठी दिलेल्या फोन नंबरवर आणि इमेल आयडीवर EVC येईल. तो 'Enter EVC' या बॉक्समध्ये टाका आणि व्हेरिफाय करा.
त्यानंतर एक पेज येईल. तिथे ट्रान्झॅक्शन आयडी आणि व्हेरिफिकेशन झाल्याची माहिती टाका. ट्रान्झॅक्शन आयडी नोट करा.
त्यानंतर व्हेरिफिकेशन यशस्वी झाल्याची माहिती मोबाइल नंबर आणि इमेलवर येईल.
डिजिटल सही वापरून कसं करायचं?
डिजिटल सही प्रमाणपत्र वापरून तुम्ही 'e-verify later' हा पर्याय निवडला तर तुम्ही रिटर्न भरताना इ- व्हेरिफाय करू शकत नाही.
ज्यांना रिटर्न भरल्यानंतर लगेच इ-व्हेरिफाय खरायचं असेल तर ते DSC हा पर्याय निवडू शकतात.
इ-व्हेरिफेशन पेजवर 'I want to verify using digital signature certificate' वर क्लिक करा आणि पुढे जा.
'Verify Your Identity' page वर 'Download Engineer Utility' या पर्यायावर क्लिक करा.
इंजिनिअर युटिलिटी पेज डाऊनलोड आणि इन्स्टॉल झाल्यावर 'I have downloaded and install Engineer Utility' हा पर्याय निवडा आणि आयडेंटिटी पेज व्हेरिफाय करा आणि पुढे जा.
डाटा आयडेंटिफिकेशन पेजवर प्रोव्हाईडर हा पर्याय निवडा आणि सर्टिफिकेट तसंच प्रोव्हाईडर पासवर्ड टाका. आता Sign वर क्लिक करा.
व्हेरिफिकेशन झाल्याचा मेसेज आणि इमेल तुम्हाला येईल.
इ- व्हेरिफिकेशन केलं तर दंड लागतो का?
जर तुम्ही वेळेत इ-व्हेरिफिकेशन केलं नाहीत तर तुमचा रिटर्न ग्राह्य धरला जात नाही. रिटर्न भरला नाही तर आयकर कायदा 1961, नुसार कारवाई होते.
 
मात्र दिलेल्या वेळेत टॅक्स का भरला नाही याचं कारणं सांगून पुन्हा भरता येतो. जर सबळ कारण असेल तर आयकर विभाग पुन्हा इ-व्हेरिफाय करण्याची संधी देत.
 
इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड काय आहे?
Electronic Verification Code (EVC) हा दहा अंकी कोड आहे.
 
तो बँक अकाऊंट आणि डिमॅट अकाऊंच्या व्हेरिफिकेशनसाठी इ-फायलिंग पोर्टल, मोबाइल नंबर आणि इमेलवर पाठवला जातो. एकदा तयार झाला की 72 तासांसाठी उपलब्ध असतो.
Published By- Priya Dixit