सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जुलै 2022 (08:19 IST)

निवृती वेतन धारकास मोबाईलव्दारे घरी बसूनच करता येणार जीवन प्रमाणपत्र

pension
आता भविष्य निधि कायद्या अंतर्गत कर्मचारी पेंशन योजना १९९५ (ई पी एस-१९९५) अंतर्गत पेन्शन दिली जाते. या योजनेत दरवर्षी निवृती वेतन धारकास डिजिटल जीवन प्रमाण पत्र (हयातीचा दाखला) भरावा लागतो. भविष्य निधी संगठन, श्रम मंत्रालय, भारत सरकारने वयोवृध्द पेन्शन धारकासाठी नवीन प्रणाली लागू केली आहे. त्यात आता मोबाईल व्दारे घरी बसून चेहरा प्रमाणीकरण (face authentication) व्दारे हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) करता येणार आहे. त्यासाठी कोठेही बँकेत किवा सीएससी (आपले सरकार) केंद्रात चकरा मारण्याची गरज नाही अशी माहिती नाशिक क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त अनिलकुमार प्रीतम यांनी दिली आहे.
) कोणत्याही एंड्राईड स्मार्टफोनचा उपयोग करावा लागेल
2) कोणत्याही बाहेरील उपकरणाची आवश्यकता नाही
3) बँकेत जाण्याची आवश्यकता नाही
4) बायोमयट्रिक (Bio-Matric) वर बोटाची ठस्से जुलत नसेल तरी चिंता करण्याची गरज नाही
या प्रणाली साठी आवश्यक गोष्टी :
1) एंड्राईड स्मार्टफोन (७ च्या वरचे व्हर्जन असलेला )
2) मोबाईलला इंटरनेट कनेक्शन असण्याची गरज आहे
3) पेन्शन ज्या बँकेतुन किवा पोस्ट ऑफिस मधून मिळते त्याला आधार नंबर जोडलेला असावा
4) मोबाईलचा कॅमेरा ५ एमपी (मेघाफिक्सल) किवा त्यापेक्षा जास्त रिज्युलेशनचा असावा
जीवन प्रमाणपत्र फाइल करण्याची प्रक्रिया :
1) गूगल प्ले स्टोअर मधून आधार फेस रीडर अॅप डाउनलोड करा त्यानंतर हे अॅप सेटिंग इन्फो (infro) मध्ये दिसेल
2) जीवन प्रमाणपत्र फैस अॅपलीकेशनला https://Jeevanpraman.gov.in/package/download मधून डाउनलोड करा
3) फाइल डाउनलोड मधून अॅपला इन्स्टॉल करा आणि आवश्यक सहमती द्या
4) ऑपरेटर प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करा व ऑपरेटरचा चेहरा स्कॅन करा ही एक वेलची प्रक्रिया आहे यामध्ये पेंशनधारक ही ऑपरेटर होवू शकतो
5) मोबाईल पेंशनचे प्रमाणीकरण व जीवन प्रमाण पत्र (DLC) जनरेशन साठी तयार असेल
6) त्यात पेन्शनर (निवृत्तिवेतन धारक) चे विवरण भरा
7) पेन्शनर (निवृतिवेतन धारक) चा लाइव फोटोग्राफ स्कॅन करा (फोटो समोरच्या बाजूने, डोके झाकलेले किवा काही हावभाव न करता चांगल्या प्रकाशात घेणे आवश्यक आहे. बोटाची ठस्से जुळत नसेल तर,  अॅप सेटिंग इन्फो, चेहरा स्कॅन करा ही एक वेळची प्रक्रिया आहे. फोटो समोरच्या बाजूने, डोळे न झाकता व काही हावभाव न करता चांगल्या प्रकाशात घेणे आवश्यक आहे.
8) त्यानंतर सबमिट केल्यानंतर पेंशन धारकाने दिलेल्या मोबाईल नंबर वर एक मेसेज येईल त्यामधे जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करण्यास एक लिंक दिलेली असेल.
तरी सर्व निवृत्तिवेतन धारकानी या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त अनिलकुमार प्रीतम यानी केले.