मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (15:33 IST)

मायलेज 10 टक्के वाढेल, या 6 सोप्या ट्रिक्स अमलात आणा

आपली कार कमी मायलेज देत असेल आणि याची तुम्हाला काळजी वाटत असेल तर आज आम्ही आपल्याला सांगत आहोत अशा सहा सोप्या ट्रिक्स ज्याच्या मदतीने आपण आपल्या वाहनांचे मायलेज 10 टक्कयांपर्यंत वाढवू शकता.
 
ब्रेक 
सतत ब्रेक लावणे किंवा पाय ब्रेकवर असणे किंवा कमी अंतरासाठी जोरात अॅक्सलरेट करणे अशा सवयींमुळे इंधन जास्त लागतं. वेग वाढवून ब्रेक लावत राहिल्यामुळे मायलेज कमी येतं.
 
स्पीड 
स्पीडने वाहन चालवण्यची सवय असल्यास त्याचा थेट परिणाम इंजिनच्या ताकदीवर होतो. आणि याचा परिणाम मायलेजवर पडतो. गाडी 50 ते 60 या किमी प्रति वेगाने चालवावी. या वेगाने गाडी चालवल्याने मायलेज चांगलं मिळतं.
 
टायर प्रेशर 
वाहनाच्या टायरमध्ये हवा कमी असल्यास मायलेज कमी होतं. बरेच दिवस टायरमध्ये हवा न भरणे योग्य नाही. थोड्या थोड्या दिवसांनी टायरची हवा तपासून घ्यावी.
 
नायट्रोजन
अधिक मायलेज हवं असल्यास टायरमध्ये नायट्रोजन भरावी. टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा असल्यास 30 टक्के अधिक मायलेज नियंत्रणात ठेवता येते.
 
एअर फिल्टर
कारचा एअर फिल्टर खराब झाला असल्यास थेट परिणाम इंजिनावर पडतो. याने इंधन वेगाने जळायला सुरु होतो आणि मायलेज घटते. फिल्टर तपासत राहावे कारण यात धूळ-मातीचे कण अडकून राहतात.
 
सर्व्हिसिंग
वाहनांची सर्व्हिसिंग वेळेवर केल्यास मायलेजवर परिणाम दिसून येतो. वेळेवर सर्व्हिसिंग केल्यास कारचे पार्ट आणि इंजिन चांगल्याप्रकारे काम करतं.