गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (17:16 IST)

आता आपण SMSद्वारे एसबीआय कार्ड ब्लॉक करू शकता, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

क्रेडिट कार्ड सोबत बरेच फायदे मिळतात अशा परिस्थितीत, कार्डाची काळजी घेणे आवश्यक असते. कारण आजच्या काळात आपली एक छोटीशी चूक आपल्यासाठी   घातक ठरू शकते. SMSद्वारे एसबीआय  क्रेडिट कार्ड कसे ब्लॉक करू शकता ते जाणून घ्या.
 
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या वेबसाईटवर लिहिले आहे, "एसबीआय कार्ड कोणत्याही संशयास्पद आणि फसव्या व्यवहारांपासून आपले संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. जर SBI ने आपल्या कार्डावर काही संशयास्पद हालचाली पाहिल्या तर SBI आपल्याला कोणत्याही गैरवापरापासून वाचवण्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव ते कार्ड ब्लॉक करतील.''
 
SMS द्वारे कार्ड कसे ब्लॉक करावे 
 
जर आपले कार्ड गहाळ झाले असेल किंवा ते चोरीला गेले असेल तर अशा परिस्थितीत आपण  एसएमएसद्वारे आपले कार्ड ब्लॉक करू शकता. कार्ड ब्लॉक करण्यासाठी BLOCK XXXX (XXXX - क्रेडिट कार्डचे शेवटचे चार अंक) लिहिल्यानंतर तुम्ही 5676791 या SMS द्वारे ब्लॉक करू शकता. याशिवाय, आपण  18601801290/39020202 वर जाऊन ब्लॉक करू शकाल.
 
कार्ड ब्लॉक झाले आहे की नाही हे कसे जाणून घ्यावे 
या संपूर्ण प्रक्रियेनंतर, आपल्याला एसएमएस, मेल किंवा आयव्हीआर कॉलद्वारे कार्ड ब्लॉक झाल्याची माहिती मिळेल. जर काही कारणास्तव आपल्याला बँकेकडून कोणतेही अपडेट मिळत नसेल, तर अशा परिस्थितीत ते SBI कार्ड हेल्पलाईन 39020202 किंवा 1860 180 1290 वर कॉल करून सहज माहिती मिळू शकते. परंतु लक्षात ठेवा की ब्लॉक केलेले कार्ड पुन्हा ऍक्टिव्हेट  केले जाऊ शकत नाही.