कामाची गोष्ट : Aadhar वर E-KYC ने त्वरित मिळेल PAN
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आधार कार्ड धारकांना PAN क्रमांक देण्याची सेवा सुरू केली.
उल्लेखनीय आहे की वर्ष 2021 - 21 च्या अर्थसंकल्पात आधाराच्या मार्फत तात्काळ ऑनलाईन PAN जारी करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या अंतर्गत तपशीलवार अर्ज भरण्याची गरज नसणार. E-KYC च्या मदतीने तात्काळ पॅन क्रमांक देण्यात येईल.
सीबीडीटीने सांगितले की ही सुविधा त्या पॅन अर्जदारांना देण्यात येईल, ज्यांच्याकडे वैध आधार क्रमांक आहे आणि त्यांचा मोबाइल नंबर आधार क्रमांकाशी जोडलेला आहे. वाटप करण्याची प्रक्रिया कागदपत्र मुक्त असणार, आणि आवेदकांना इलेक्ट्रानिक पॅन विनामूल्य देण्यात येईल.
हे लक्षात घेण्या सारखे आहे की आधाराला पॅनशी जोडण्याची शेवटची तारीख 30 जून 2020 आहे.
पॅनला आधाराशी कसे जोडावे :
पॅन क्रमांक मिळविण्यासाठी अर्जदाराला आयकर विभागाच्या ई - फायलिंग संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार. त्या संकेतस्थळावर आपले आधार क्रमांकाला प्रविष्ट करावे लागणार. त्यानंतर त्याला आधाराशी जोडलेल्या मोबाईल नंबर वर आलेल्या ओटीपी नंबर प्रविष्ट करावा लागणार.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर एक 15 अंकी स्वीकृती क्रमांक मिळेल. अर्जदार आपले वैध असलेले आधार क्रमांकाला देऊन आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकतो. यशस्वीरीत्या पॅन वाटपानंतर तो ई पॅन डाउनलोड करू शकतो. ई पॅन अर्जदाराच्या ईमेल वर पाठविण्यात येईल.