सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (17:02 IST)

आता PF खात्यातील समस्यांचे समाधान मिळवा व्हाट्सअ‍ॅपवर मेसेज करून

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ने आपल्या खातेधारकांच्या तक्रारीचे त्वरित निराकरण करण्यासाठी व्हाट्सअ‍ॅप (WhatsApp) हेल्पलाईन सेवा सुरु करण्यात आली आहे.
 
कामगार मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की ईपीएफओच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ही सुविधा इतर मंचाच्या व्यतिरिक्त आहे. 
 
या मंचांमध्ये ईपीएफआयजीएमएस पोर्टल (ईपीएफओ च्या ऑनलाइन तक्रार निराकरण पोर्टल), सीपीजीआरएएमएस, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (फेसबुक आणि ट्विटर) आणि 24 तास काम करणारे कॉल सेंटर समाविष्ट आहे. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की ईपीएफओने आपल्या सदस्यांचे जीवन अधिक सुलभ करण्यासाठी व्हाट्सअ‍ॅप आधारित हेल्पलाईन- कम-तक्रार निवारण प्रणाली सुरु केली आहे. या अखंड उपक्रम मालिकेच्या अंतर्गत घेतलेल्या या पुढाकाराचा उद्देश भागीदारांना कोविड-19 साथीच्या दरम्यान अखंड आणि अखंडित सेवा पोहोचविणे सुनिश्चित करणे आहे.
 
या उपक्रमाच्या माध्यमाने पीएफ खातेधारक स्वतंत्र पातळीवर ईपीएफओच्या क्षेत्रीय कार्यालयांशी थेट संवाद साधू शकतात. आता ईपीएफओच्या सर्व 138 क्षेत्रीय कार्यालयां मध्ये व्हाट्स अ‍ॅप हेल्पलाइन सेवा सुरु करण्यात आली आहे. पीएफ खाते असलेल्या कोणत्याही संबंधित पक्ष जेथे त्यांचे खाते आहेत, त्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या हेल्पलाईन नंबर वर कोणत्याही प्रकारची ईपीएफओ सेवेशी संबंधित तक्रार व्हाट्सअ‍ॅप संदेशद्वारे नोंदवू शकतात. सर्व क्षेत्रीय कार्यालयाचे व्हाट्स अ‍ॅप हेल्पलाइन नंबर ईपीएफओच्या अधिकृत संकेत स्थळांवर उपलब्ध आहेत.
 
ईपीएफओच्या या व्हाट्स अ‍ॅप हेल्पलाइनचा उद्देश्य, डिजिटल पुढाकार घेऊन अंशधारकांना स्वावलंबी बनविणे आणि मध्यस्थांवरील असलेल्या त्यांच्या अवलंबतेला दूर करणे आहे. तक्रारींचे त्वरित निवाकरण होण्यासाठी आणि व्हाट्सअ‍ॅप वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात तज्ञांची एक स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे. 
 
ही हेल्पलाईन सेवा सुरु केल्यापासून ती फार लोकप्रिय झाली आहे. आतापर्यंत ईपीएफओने व्हाट्सअ‍ॅप च्या माध्यमातून सुमारे 1,64,040 पेक्षा अधिक तक्रारी आणि प्रश्नांचे निराकरण केले आहेत. 
 
व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन नंबर प्रसिद्ध झाल्यानंतर फेसबुक / ट्विटरसारख्या सोशल मीडिया माध्यमांवरील तक्रारी / प्रश्नांमध्ये 30 टक्के आणि ईपीएफआयजीएमएस पोर्टलवर (ईपीएफओच्या ऑनलाइन तक्रार निवारण पोर्टल) मध्ये 16 टक्के घट होण्याचे समजले आहे.