शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: रविवार, 7 ऑगस्ट 2022 (17:16 IST)

Ration Card: रेशन कार्डसाठी सरकार ने नवीन नोंदणी प्रक्रिया सुरु केली

ration card
How to apply for Ration Card?केंद्र सरकारनं लोकांना रेशनचा लाभ देण्यासाठी नवीन पोर्टल सुरू केलं आहे. या अंतर्गत बेघर, निराधार, मजूर आणि इतर पात्र लाभार्थी शिधापत्रिकेसाठी अर्ज करू शकतात.राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत 81.35 कोटी लोक जोडले गेले आहेत. या योजने अंतर्गत 1.58 कोटी लोकांना या योजनेत जोडलं जाणार आहे. या NFSA योजने अंतर्गत पात्र असलेली राज्ये आणि लाभार्थी यांना मदत करणं हे त्याचे उद्दिष्ट आहे.आता नवीन पोर्टल अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची शिधापत्रिका बनवली जाणार आहेत.अन्न सचिव सुधांशू पांडे म्हणाले की, नवीन वेब बेस सुविधा प्रायोगिक तत्त्वावर 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिली जाईल. 
 
या महिन्याच्या अखेरीस, सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या व्यासपीठावर समाविष्ट केले जातील. त्यात आसाम, गोवा, लक्षद्वीप, महाराष्ट्र, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, पंजाब आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे.
 
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही NFSA च्या नवीन पोर्टलला भेट देऊन अर्ज करू शकता. तसेच, Ration Mitra अॅपवर मोबाईल लिंक करूनही याचा लाभ घेता येईल. या सुविधेमुळं राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांतील पात्र लाभार्थी ओळखण्यात आणि त्यांना यादीत समाविष्ट करण्यात मदत होईल. सर्व 36 राज्ये/केंद्रशासित प्रदेश वन नेशन वन रेशन कार्ड (ONORC) योजनेअंतर्गत जोडले गेले आहेत.