शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Updated :नवी दिल्ली , शनिवार, 19 जून 2021 (12:39 IST)

EPFO Alert : सहा कोटी लोकांना नॉमिनीचे आधार करावे लागेल लिंक, फोटोदेखील अपलोड करावा लागेल

खासगी आणि सरकारी उपक्रमांत कार्यरत सुमारे सहा कोटी कर्मचाऱ्यांना त्यांचे पीएफ खाते अपडेट करावे लागेल. त्यांना नॉमिनी (Nominee चा आधार क्रमांक पीएफ (Provident Fund Account) खात्याशीही लिंक करावा लागेल.
 
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी (PF) सांभाळते. सरकारने अलीकडेच ईपीएफओच्या या योजनेस सामाजिक योजनांच्या कक्षेत समाविष्ट केले आहे. तर, आता सर्व कर्मचार्यांना त्यांचा आधार क्रमांक पीएफ खात्यासह जोडावा लागेल. त्याची शेवटची तारीख 1 सप्टेंबर आहे. यासह ईपीएफओ नॉमिनीची माहितीही ऑनलाईन अपडेट करत आहे. लवकरच नॉमिनीच्या तपशिलांचे आधाराशी जोडणीही सुरू केली जाईल. तसेच त्याचा फोटो देखील ईपीएफओची सदस्य वेबसाइट  https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर अपलोड करावे लागेल. 
 
ई-नामांकन (E-nomination) सुविधा देखील सुरू केली
ईपीएफओने आता उमेदवाराची माहिती देण्यासाठी ई-नामनिर्देशन सुविधा सुरू केली आहे. यामध्ये ज्या लोकांचे नामांकन नाही, त्यांना संधी दिली जात आहे. नॉमिनीचे नाव, जन्म तारीख ऑनलाईन अपडेट केली जाईल.
 
म्हणून आवश्यक आहे नामांकन  
ईपीएफओ केवळ पीएफ खात्यावर व्याज आणि निवृत्तिवेतनाची सुविधा देत नाही तर 7 लाखांपर्यंतचा विमा देखील प्रदान करते. तर, जर नॉमिनी आधार संख्याद्वारे पडताळणी केली गेली असेल तर त्यांचे क्लेम निकाली काढणे सोपे होईल. याद्वारे ऑनलाईन ई-क्लेमची सुविधादेखील सुरू केली जाईल.
 
जर पीएफ खात्यात आधारचा डेटा मिसमॅच झाला तर तुम्हाला पीएफचा लाभ मिळणार नाही
आधार डेटा केवळ केंद्र सरकारसाठी वैध आहे. आणि आधार क्रमांक जारी करणारी संस्था यूआयडीएआय ((UIDAI, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) आपली पडताळणी करते. त्यामुळे पीएफ खात्यात आधार डेटा जुळत नसल्यास तुम्हाला पीएफचा लाभ मिळणार नाही.