शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑगस्ट 2020 (16:37 IST)

या योजनेत पैसे गुंतवले तर लवकर होतील दुप्पट!

कोरोना व्हायरसच्या (#coronavirus) संकटकाळात छोटी-मोठी बचत अनेकांच्या कामी येत आहे. लॉकडाऊनआधी केलेले सेव्हिंग आता उपयोगात येत आहे. दरम्यान भविष्यात अशी पैशांची चणचण भासू नये याकरता अनेकांनी छोटी-मोठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. 
 
दरम्यान तुम्ही देखील अशी गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. SIP ची खास बाब म्हणजे प्रत्येक महिन्याला छोटी गुंतवणूक करुन एक चांगला रिटर्न तुम्ही मिळवू शकता.
 
जेवढ्या लवकर तुम्ही या योजनेमध्ये पैसे गुंतवण्या सुरुवात कराल, तेवढा मिळणारा रिटर्न अधिक असतो. एसआयपीमध्ये (SIP- Systematic Investment Plan) गुंतवणूक केल्यानंतर एक उत्तम रिटर्न तुम्हाला मिळू शकतो, ज्यातून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता.
 
काय आहे एसआयपीचे गणित?
जर तुमचे वय 30 वर्षे आहे आणि तुम्ही एसआयपीमध्ये प्रत्येक महिन्याला 5000 रुपयांची गुंतवणूक करत आहात. जर तु्म्ही 25 वर्षांपर्यंत यामध्ये गुंतवणूक करत राहिलात तर तु्म्हाला सरासरी 12 टक्के रिटर्न मिळण्याची आशा आहे. अशी गुंतवणूक केल्यास 25 वर्षानंतर तुम्ही 84,31,033 रुपयांचे मालक बनू शकाल. 30 वर्षांचे असल्यापासून गुंतवणूक सुरू केली असल्यास याचा कालावधी संपेपर्यंत तुमचे वय 55 वर्षे झाले असेल.
 
मात्र जर वयाच्या 25 व्या वर्षापासून 55 वर्षापर्यंत तुम्ही गुंतवणूक केली तर 12 टक्के रिटर्नच्या हिशोबाने या 30 वर्षानंतर ही रक्कम 1,52,60,066 रुपये होईल. याचा अर्थ असा की, जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक करण्यास सुरूवात कराल, तेवढा जास्त फायदा तुम्हाल मॅच्यूरिटीवेळी होईल.
 
एसआयपी म्हणजे काय? (SIP- Systematic Investment Plan) 
SIP म्हणजे  सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान मध्ये गुंतवणूकदाराला एक निश्चित रक्कम नियमित रुपाने म्युच्यूअल फंडच्या कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा देतात. हा म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सोपा मार्ग आहे. यामध्ये तुम्हासा तुमच्या कमाईमधून छोटीशी रक्कम काढून प्रत्येक महिन्याला म्युच्यूअल फंडचे युनिट खरेदी करावे लागतात. काही वर्षांपर्यंत केलेली ही छोटी गुंतवणूक मोठी रक्कम मिळवण्यासाठी फायदेशीर आहे.