Dharma Sangrah
✕

खास ग्रामीण बांधवांसाठी 'स्वामित्व योजना' अर्ज कसे करावे जाणून घ्या

Updated: शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (10:33 IST)
 
स्वामित्व योजना म्हणजे काय - सरकारने ग्रामीणांच्या जमिनीची नोंद ठेवण्यासाठीच्या उद्देश्याने ही स्वामित्व योजना सुरू केली. या योजनेमार्फत ग्रामीणांना जमिनीच्या वादापासून मुक्तताच मिळणार नाही, तर त्यांना बँकेतून सहजपणे कर्ज देखील मिळू शकेल. सरकार कडे या जागेचे डिजीटल तपशील देखील ठेवता येऊ शकेल.
 
ई ग्राम स्वराज पोर्टल ग्राम पंचायतच्या विकासासाठी केंद्र सरकार देखील मदत करणार आहे. गावाच्या सर्व मालमत्तेचे मॅपिंग करण्याची देखील तरतूद करण्यात आली आहे. ई ग्राम स्वराज पोर्टल त्यांना या साठी प्रमाणपत्र देखील देईल. 
 
योजनांचा उद्दिष्टे - या योजनेचा मुख्य उद्दिष्ट ग्रामीण शेतकर्‍यांच्या जमिनींची ऑनलाईन देखरेख करणं, जमिनीचे मॅपिंग करून त्यांचा हक्काच्या मालकांना त्यांचा हक्क मिळवून देणं, जमिनी प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, ग्रामीणांच्या बाजूनं या योजने अंतर्गत कामे केली जातील. 
 
ही योजना येत्या चार वर्षात (2020-24) संपूर्ण देशात टप्पा-टप्प्यानं राबविली जाणार आहे. सुरुवातीस सुमारे 6.62 लाख गावे ह्याचा हद्दीत येतील. याचा लाभार्थ्यांना एका दिवसातच आपल्या संपत्ती कार्डाची भौतिक प्रति मिळणार.
 
ग्रामीणांना काय फायदा होणार - संपत्ती कार्ड योजनेत (SVAMITVA SCHEME) ग्रामीणांना आपल्या जमीन आणि मालमत्तेला आर्थिक मालमत्ता म्हणून वापरण्याची सुविधा मिळेल. याचा बदल्यात ते बँकेकडून कर्ज आणि इतर आर्थिक लाभ घेऊ शकतात. मालमत्ता मालक आपल्या संपत्ती किंवा मालमत्तेशी निगडित कार्ड आपल्या मोबाइलवर एस एम एस लिंक च्या मार्फत डाउन लोड करू शकतात. या नंतर राज्य सरकार संपत्ती कार्डाचे भौतिक वाटप करणार.
 
अर्ज कसा करावा - पंतप्रधान स्वामित्व 2020 या योजनेमध्ये अर्ज करणं खूप सोपं आहे. आपण या प्रक्रियेचे अनुसरणं करून सहजरीत्या अर्ज करू शकतात.
 
* सर्वप्रथम आपण पीएम स्वामित्व योजनेच्या अधिकृत संकेत स्थळांवर क्लिक करा.
* संकेत स्थळांवर गेल्यावर त्यांचा होमपेज वर न्यू रजिस्ट्रेशन च्या पर्यायावर क्लिक करा.
* या पर्यायावर क्लिक केल्यावर आपल्या समोर एक फॉर्म उघडेल. विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी आणि सबमिट बटण दाबा.
* आता आपला फॉर्म यशस्वीरीत्या भरला गेला आहे. नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन संबंधित माहिती आता आपल्या मोबाईल नंबर वर एसएमएस किंवा ई मेल ने मिळेल.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments