1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (20:19 IST)

Happy Hug Day 2022: प्रथमच मैत्रिणीला ह्ग करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Happy Hug Day 2022: Remember these things when hugging a girlfriend for the first time Happy Hug Day 2022: प्रथमच मैत्रिणीला ह्ग करताना या गोष्टी लक्षात ठेवा Valentine Day Marathi Love Station Marathi Lifestyle Marathi
व्हॅलेंटाईन आठवड्याच्या सहाव्या दिवशी म्हणजे १२ फेब्रुवारीला हग डे साजरा केला जातो. हग डे हा जोडप्यांसाठी एकमेकांना मिठी मारून त्यांचे प्रेम व्यक्त करण्याचा खास प्रसंग आहे. जे शब्दात व्यक्त करता येत नाही, ते अनेकदा जोडप्यांना हृदयाच्या ठोक्यांमधून आपल्या जोडीदाराची जाणीव करून देते. हग डेच्या दिवशी, तुम्हाला आवडत असलेल्या व्यक्तीला जादूची मिठी देऊन आपण आपल्या भावना आणि आपल्या हृदयाची स्थिती सांगू शकता, 
 
प्रथमच आपल्या मैत्रिणीला मिठी मारताना या गोष्टी लक्षात ठेवा.
 
- जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला पहिल्यांदाच मिठी मारत असाल तर भावनांवर नियंत्रण ठेवा. म्हणजेच, त्यांना खूप घट्ट मिठी मारू नका किंवा अस्वस्थ होऊन त्यांना हलकेच मिठी मारू नका.
 
मिठी मारताना जोडीदाराच्या भावनाही समजून घ्या. जर तुमची मिठी त्यांना अस्वस्थ करत असेल तर त्यांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न करा.
 
मिठी मारताना, लक्षात ठेवा की त्यांना जास्त वेळ धरून ठेवू नका आणि एकाएकी त्यांना दूर लोटून देऊ नका.
 
मिठी मारताना घाई करू नका. घाईगडबडीत मिठी मारण्यापेक्षा आधी आपल्या  जोडीदाराच्या डोळ्यात पहा. मग त्यांना गोड हसून मिठी द्या. असे केल्याने पार्टनर देखील मिठीसाठी तयार होईल आणि सहज तो मिठीत येईल.
 
जेव्हा आपण जोडीदाराला मिठी मारून वेगळे होऊ इच्छित असाल तेव्हा त्यांच्या कानात काहीतरी रोमँटिक बोला
 
-मुलींना गळ्यात हात घालून मिठी मारायला आवडते आणि मुलांना कंबरेला हात घालून मिठी मारायला आवडते. अशा परिस्थितीत जर आपण मुलीला मिठी मारत असाल तर तिच्या कमरेत हात घाला. दुसरीकडे, जर मुलींना त्यांच्या बॉयफ्रेंड किंवा कोणत्याही मुलाला मिठी मारायची असेल, तर त्यांच्या गळ्यात हात घालून मिठी मारा.