शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Updated : शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (09:20 IST)

Promise Day वर करा आयुष्य भर साथ देण्याचं वचन

प्रेमासाठी कोणता ठराविक दिवस नसतो. ह्या तर त्या भावना आहे ज्या कधीही येऊ शकतात. असं म्हणतात की फेब्रुवारीचा महिना प्रेमी जोडप्यांसाठी खास असतो. हाच तो महिना आहे ज्यामध्ये आपल्या विशिष्ट मित्राला मैत्रीच्या पलीकडे जाऊन आपल्या प्रेमाला व्यक्त करतात. आता हे  प्रेम गुलाबाचे फुल देऊन रोज डे ला देऊन किंवा प्रॉमिस डे ला काही खास वचन देऊन व्यक्त करू शकतात.  
 
व्हॅलेंटाइन आठवड्याचा पाचवा दिवस आहे प्रेमाच्या वचनाच्या नावाने साजरे करतात.  म्हणजे तो दिवस आहे प्रॉमिस डे. या दिवशी प्रेमी जोडपे एकमेकांवर प्रेम करण्याचा आणि त्या प्रेमाची जपणूक करण्याचे वचन घेतात. या मुळे वेळ जसं जसं सरेल त्यांचे एकमेकांवरील प्रेम देखील अधिकच घट्ट होईल. 
 
व्हॅलेंटाइन आठवड्याची तरुणांमध्ये खूप क्रेझ आहे. हा संपूर्ण आठवडा काही न काही  डे म्हणून साजरा करतात. कधी रोज डे,कधी चॉकलेट डे, तर कधी प्रपोज डे, चॉकलेट डे नंतर प्रॉमिस डे साजरा करतात. बरेच तरुण या दिवशी काही न काही वचन देऊन आपल्या प्रेमाची कबुली देतात. हे तर नंतरची बाब आहे की तरुणांनी या दिवशी दिलेल्या वचनांचे पालन किती दिवस केले. हे आपल्यावर आहे की आपण या दिलेल्या वचनांना किती दिवस पाळता.    
 या दिवशी आपण आपल्या खास व्यक्तीला वचन द्या की आपण त्यांच्यासह कायमचे नाते जोडू इच्छिता आणि  आयुष्यभर आपण त्यांचा साथ द्याल. परंतु हे लक्षात ठेवा की  हे निव्वळ प्रॉमिस नसावे त्या वचनाला पूर्ण करा. जर आपण देखील कोणास गमावू इच्छित नाही किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तींसह आजीवन आयुष्य घालवू इच्छिता, तर हा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा असू शकतो.मग विलंब कशाचा स्वतःला या दिवशी एका अतूट नात्यात गुंतवा.असं नातं जोडा जे कधीही तुटणार नाही.प्रॉमिस डे च्या शुभेच्छा .