सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (21:46 IST)

Promise Day : शिका पाहिलं तुम्ही, दिलेला शब्द पाळण्याचा!!

वचन देणं, वचन घेणं कित्ती उदात्त क्रिया,
एकमेकांनी परस्परास समजून घ्यायची प्रक्रिया,
पण ते निभावणं, जगण्या पेक्षाही महाकठीण,
त्यातूनच उमगून येते, कित्ती घट्ट आहे नात्यातील वीण,
निभावताना वचन नसते कशाची तमा,
डोळ्यासमोर असतं फक्त वचन अन आपली प्रियतमा,
येऊ देत ना कितीही वादळं, पडू देत भेगा,
पुन्हा उभं राहू ताकतीने, थोडं सबुरीने वागा,
वचन देणं कोण्या येऱ्या गबाळ्या च काम नव्हें,
अन त्यास कसोशीने पाळण ,इतकं सोप्पं नव्हे.
म्हणून गडयानो खेळ नव्हे बरं हा लुटुपुटू चा,
शिका पाहिलं तुम्ही, दिलेला शब्द पाळण्याचा!!
...अश्विनी थत्ते